MPSC News

Ladki Bahin Yojana: ऑगस्टमध्ये अर्ज दाखल केलेल्या लाडक्या बहि‍णींना यादिवशी मिळणार पैसे ! पाहा संपुर्ण माहिती!

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेला सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर आता असंख्य महिला ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात कधी पैसे येणार, अशी विचारणा करत आहे. आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरु झाली. सुरुवातीला या योजनेचे अर्ज भरताना महिलांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर सरकारने यात अनेक बदल करत ही प्रक्रिया सोपी-सुटसुटीत बनवली. यानंतर असंख्य महिलांनी जुलै महिन्यात हा अर्ज दाखल केला. या सर्व महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3 हजार रुपये रक्षाबंधनापूर्वी मिळाले. यानंतर आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु करण्यात आली. आता अखेर ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार? याची माहिती समोर आली आहे.

अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती – Ladki Bahin Yojana

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा येत्या 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु आहे. त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील”, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

जुलै महिन्यात 1 कोटी 8 लाख महिला लाभार्थी- Ladki Bahin Yojana

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. यातील पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पुण्यात पार पडला होता. त्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जात आहे. ऑगस्ट महिन्यात साधारण 50 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. या अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये दिले जाणार आहे. यापूर्वी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1 कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते.

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel