20 November 2025 Chalu Ghadamodi in Marathi Notes

Chalu Ghadamodi in Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की चालू घडामोडी (Chalu Ghadamodi in Marathi) हा किती महत्त्वाचा विषय आहे त्याच योगायोगाने आपण दररोज उद्यापासून चालू घडामोडी ची (Chalu Ghadamodi in Marathi) सिरीज चालू केलेली आहे यामध्ये तुम्हाला दररोज नवीन टॉपिक बद्दल माहिती देण्यात येईल खाली दिलेले टॉपिक आजच्या पेपरमधील शॉर्ट नोट्स दिलेला आहेत सर्वांनी वाचून घ्या याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल.

नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी यूकेला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

  • युनायटेड किंगडमला देश भागीदार म्हणून घोषणा
  • हॉर्नबिल उत्सव हा नागालँडचा सर्वात मोठा उत्सव असतो
  • हॉर्नबिल उत्सव – 1 ते 10 डिसेंबर 2025 (दरवर्षी )
  • 2025 ला हा 26 वा उत्सव आहे
  • ठिकाण – किसामा गाव , कोहिमा नागालँड
  • या वर्षी स्कॉटिश कलाकार रुईरिध मॅकलीन (रुमॅक), 2 डिसेंबर 2025 रोजी सादरीकरण करतील.
  • नागालँडचे मुख्यमंत्री – डॉ. नेफ्यू रिओ

ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट (GELS) 2025

  • ठिकाण – पुरी , ओडीसा
  • दिनांक – 5 ते 7 डिसेंबर 2025
  • आयोजक – ओडिशा राज्य सरकारचे ऊर्जा विभाग , TBI आणि IIT कानपुर
  • थीम: “पॉवरिंग इंडिया: सफिशिएन्सी, बॅलन्स, इनोव्हेशन”
  • या परिषदेत समकालीन आणि भविष्यकालीन ऊर्जा क्षेत्रातील विषयांवर चर्चा होणार आहे
  • ओडिशामध्ये आयोजित होणारे या प्रकारचे पहिले शिखर परिषद आहे
  • परिषदेचा उद्देश  – भारताचा सहकारी संघराज्यवाद आणि 2070 पर्यंत Net Zero साध्य करण्याच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाला चालना देणे आहे

मध्य प्रदेशातील पन्ना हिऱ्यांना GI टॅग मिळाला

  • GI टॅग हा 14 – नैसर्गिक वस्तूंच्या श्रेणीमध्ये
  • पन्ना हा भारतातील एकमेव हिरे उत्पादक जिल्हा आहे
  • पन्ना जिल्हा ‘डायमंड सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे
  • पन्ना येथील हिरे कार्यालय 1961 पासून कार्यरत आहे
  • मध्य प्रदेशाचा 21 वे GI उत्पादन आहे

BSF ने “दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन” लाँच केले

  • नाव – दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन
  • सीमा सुरक्षा दलाने (BSF) ने सुरू केले
  • पहिले पूर्णपणे महिला ड्रोन ऑपरेशन युनिट
  • यांना हवाई देखरेख , गुप्तचर माहिती गोळा करणे , ड्रोन-विरोधी ऑपरेशन्स असे प्रगत प्रशिक्षण दिले जात आहे . 
  • BSF स्थपणा – 1965 (भारत × पाकिस्तान युद्धानंतर झाली)
  • BSF प्रमुख – दलजित सिंग चौधरी.

2035 पर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई-पासपोर्ट असावा असा भारत सरकारचा संकल्प

  • ई-पासपोर्टमध्ये रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) चिप आणि अँटेना असतात
  • प्रवाशाची फोटोग्राफ, बोटांचे ठसे आणि वैयक्तिक माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात साठवली जाते
  • यामध्ये माहिती डिजिटली साइन व एनक्रिप्ट केल्यामुळे बनावट व फसवणुकीचा धोका कमी होतो

अभिनेत्री “कीर्ती सुरेश” आता युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी अ‍ॅडव्होकेट म्हणून नियुक्ती

  • राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेत्री कीर्ती सुरेश
  • नियुक्ती – 16 नोव्हेंबर 2025
  • युनिसेफ इंडियाने चाइल्ड राइट्स आणि वेल-बीइंगसाठी “सेलिब्रिटी अ‍ॅडव्होकेट” म्हणून नियुक्त केले आहे
  • Celebrity Advocate या भूमिकेत, कीर्ती सुरेश मुलांचे मानसिक आरोग्य, भावनिक कल्याण आणि बाल हक्कांच्या व्यापक पैलूंवर लक्ष केंद्रित करतील
  • ‘महानती’, ‘मभरम’ सारख्या चित्रपटांद्वारे लिंग समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक बदल यावर आधारित भूमिका साकारल्या आहेत

‘अजेय वॉरियर-25’ संयुक्त लष्करी अभ्यास 2025

  • देश – भारत × ब्रिटन
  • दिनांक – 17 ते 30 नोव्हेंबर
  • आवृत्ती – 8 वी
  • ठिकाण – बिकानेर , राज्यस्थान
  • एकूण 240 सैनिक भाग घेत आहेत
  • सुरावात – 2011 पासून
  • दर दोन वर्षांनी याचे आयोजन
  • उद्दिष्ट – दोन्ही सैन्यांमधील सर्वोत्तम लढाऊ कौशल्ये आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे, सामरिक दक्षता वाढवणे

चिलीच्या माजी अध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना 2024 चा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार

  • हा पुरस्कार त्यांना लैंगिक समानता, मानवाधिकार, लोकशाही आणि विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला गेला आहे
  • मिशेल बॅचलेट ही चिलीची पहिली महिला राष्ट्रपती आहेत
  • पुरस्कार रक्कम – 25 लाख आहे
  • पुरस्कार स्थापना – वर्ष 1986
  • दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
  • 37 वा पुरस्कार
  • 2023 विजेता 2 जणांना दिला होता
  • अली अबू अव्वाद (पॅलेस्टाईन)
  • डॅनियल बॅरेनबोइम (अर्जेंटिना)

मित्रांनो तुम्ही वरील नोट्स वाचलेच असतील अशाच नोट्स (Chalu Ghadamodi in Marathi) दररोज वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल वरती जॉईन व्हा. तुम्हाला pdf पाहिजे असल्यास खाली कमेन्ट करून सांगा तुम्हाला कधी पासून चालू घडामोडी पाहिजेत. आमच्या टीमचा पूर्ण प्रयत्न राहील.

Leave a Comment