MPSC News

04 July 2024 Chalu Ghadamodi in Marathi

Chalu Ghadamodi in Marathi – चालू घडामोडी : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील.

युद्ध अभ्यास ” मैत्री “: भारत आणि थायलँड यांच्या दरम्यान

  • ठिकाण : थाईलँड च्या ताक प्रांतात असलेल्या फोर्ट वाचिराप्रकण येथे
  • 1 ते 15 जुलै 2024 दरम्यान
  • 13 वा युद्ध अभ्यास
  • 2006 पासून या अभ्यासाची सुरवात
  • याअगोदर 2019 ला हा युद्धाभ्यास भारतात मणिपूर येथे झाला होता

भारत आणि थायलँड यांच्यात होणारे युद्ध अभ्यास

  • अभ्यास-अयुत्थाया (Excercise Ayutthaya) : नौदल युद्ध अभ्यास
  • इंडो-थाई कॉरपेट : युद्ध अभ्यास
  • सियाम भारत : युद्ध अभ्यास

थायलँड बद्दल माहिती

  • राजधानी : बँकॉक
  • पंतप्रधान : श्रेथा थाविसिन
  • भाषा : थाई
  • मुद्रा : बहत
  • 90% बौद्ध धर्म
  • लोकसंख्या 6 कोटी च्या दरम्यान

अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्या तालिबानने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र संघाच्या अफगाणिस्तान परिषदेत भाग घेतला.
अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांची तिसरी परिषद 30 जून आणि 1 जुलै 2024 रोजी कतारची राजधानी दोहा येथे
भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जेपी सिंग यांनी केले

04 July 2024 Chalu Ghadamodi in Marathi

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी NTR भरोसा पेन्शन सुरू केली

  • मुख्यमंत्री : चंद्रबाबू नायडू
  • उपमुख्यमंत्री पवन कल्याण
  • 1 जुलै 2024 रोजी योजनेला सुरवात
  • पेनुमाका गावातुन योजनेला सुरवात ( अमरावती च्या ताडेपल्ली ब्लॉक मध्ये)
  • पेन्शन ची रक्कम वाढवण्यात आली
  • वृद्ध, विधवा, विणकर, ताडी टपर, मच्छीमार, एकल महिला, मोची, ट्रान्सजेंडर आणि कलाकारांना दरमहा ₹ 3,000 वरून ₹ 4,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे .
  • अपंग आणि बहु-विकृती कुष्ठरुग्णांसाठी, पेन्शन ₹ 3,000 वरून ₹ 6,000 प्रति महिना करण्यात आली आहे
  • अपंग लोकांसाठी पेन्शनची रक्कम ₹ 5,000 वरून ₹ 15,000 पर्यंत तीन पटीने वाढली आहे
  • किडनीचे आजार आणि थॅलेसेमिया सारख्या जुनाट आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी पेन्शन ₹ 5,000 वरून ₹ 10,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शाहरुख खानला लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल करिअर अवॉर्ड जिंकणारे पाहिले भारतीय

  • फिल्म फेस्टिव्हलच्या करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड
  • दरवर्षी लोकार्नो, स्वित्झर्लंड येथे आयोजित केला जातो
  • लोकार्नो  चित्रपट महोत्सव  हा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे
  • 2005 मध्ये शाहरुख खान यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला

नुकतेच मिळालेले काही महत्वाचे पुरस्कार

  • डॉ उषा ठाकूर : 12 वा हिंदी सन्मान
  • सुब्बैया नल्लामुय : व्ही शांताराम लाईफ टाइम achievement Award
  • विनोद गणात्रा ‘नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार
  • पन्नालाल सुराणा : राजर्षी शाहू पुरस्कार

जपानने बनावट नोटा आळा घालण्यासाठी नवीन चलनी नोटा जारी केल्या

  • यामध्ये 3D हॉलोग्राम वापरले आहेत
  • पंतप्रधान : फुमियो किशिदा
  • चलन : येन

एअर इंडिया अमरावतीमध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग स्कूल उभारणार आहे

  • 2026 पर्यंत उभारणार
  • 30000 नोकऱ्या उपलब्ध होतील
  • 180 व्यावसायिक पायलट दरवर्षी उत्तीर्ण होतील.

काही महत्वाच्या स्पर्धा आणि त्यांचे आयोजन

  • पुरुष FIH हॉकी विश्व कप 2026 – बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये होणार आहेत
  • महिला FIH हॉकी विश्व कप 2026 – बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये होणार आहेत
  • क्रिकेट वर्ल्ड कप 2027 : झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेत आणि नामेबिया येथे होणार आहे
  • T20 वर्ल्ड कप 2026 : श्रीलंका आणि भारत मध्ये होणार
  • BWF विश्व ज्युनिअर बैडमिंटन चैंपियनशिप 2025 : गुवाहाटी (आसाम) मध्ये होणार
  • 38 वे राष्ट्रीय खेळ 2024 : उत्तराखंड मध्ये होणार
Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel