Municipal council 2023 Result Download PDF: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा संवार्गाची अंतिम निवडसूची व अतिरिक्त अंतिम निवडसूची (प्रतिक्षायादी) प्रसिध्द
नगरपरिषद 2023 अंतिम निवडसूची जाहीर
- महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३
- कर निर्धारण व प्रशासकीय सेवा संवार्गाची अंतिम निवडसूची व अतिरिक्त अंतिम निवडसूची (प्रतिक्षायादी) प्रसिध्द
- संचालनालयाचे प्रसिध्दीपत्रक क्र. नपप्रसं/ कक्ष- ३अ/ संवर्ग पदभरती / अंतिम निवडसूची/२०२४/५७१९ दि. १९ सप्टेंबर, २०२४
उपरोक्त संदर्भीय प्रसिध्दीपत्रकान्वये महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट-क श्रेणी-अ, ब व क संवर्गाची अंतिम निवडसूची व अतिरिक्त अंतिम निवडसूची (प्रतिक्षायादी) प्रसिध्द करण्यात आली होती. परंतु अतिरिक्त अंतिम निवडसूचीतील (प्रतिक्षायादी) श्री. निखिल रमेश महाजन – WL OBC GEN / against (OBC-PT) हे कागदपत्र पडताळणीस उपस्थित असून सुध्दा कागदपत्र पडताळणीस गैरहजर / अपात्र / ऑप्टींग आऊट उमेदवारांची यादी भाग २ मध्ये अ.क्र. ४९ गैरहजर म्हणून नाव नोंदविण्यात आले होते.
तथापी सदर उमेदवाराने दि. २२ जुलै, २०२४ रोजी पनवेल महानगपालिकेचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, तिसरा मजला, पनवेल येथे कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहून TCS-ION कंपनीमार्फत बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी केली आहे. सदर उमेदवार कागदपत्र पडताळणीअंती पात्र असल्याने त्यांचा गुणानुक्रमानुसार पात्र उमेदवारांच्या यादीत समावेश करुन इतर मागास प्रवर्गाची भाग-१ मधील श्रेणी क सर्वसाधारण उमेदवार यातील इतर मागास प्रवर्गाची सुधारित अंतिम निवडसूची व भाग-२ मधील सर्वसाधारण उमेदवार यातील इतर मागास प्रवर्गाची सुधारित अतिरिक्त अंतिम निवडसूची (प्रतिक्षायादी) तसेच कागदपत्र पडताळणीस गैरहजर / अपात्र / ऑप्टींग आऊट उमेदवारांची सुधारित यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
- संदर्भ क्र. १ च्या प्रसिध्दीपत्रकातील सूचना सदर यादीस जशाच्या तशा लागू राहतील.
- कर निर्धारण व प्रशासकीय संवर्गाची श्रेणीनिहाय भाग-१ अंतिम निवडसूची व भाग-२ अतिरिक्त अंतिम निवडसूची – – इतर मागास प्रवर्ग
- भाग- २ कागदपत्र पडताळणीस गैरहजर / अपात्र / ऑप्टींग आऊट उमेदवारांची सुधारित यादी.
Municipal council 2023 Result Download PDF
नगरपरिषद 2023 अंतिम निवडसूची | Click Here |
Municipal council 2023 Result | Download PDF |
Official Website | mahadma.maharashtra.gov.in |