अदानी विल्मार ही HUL ला मागे टाकत भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनली.

आर्थिक वर्ष 2022 साठी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अदानी विल्मार लिमिटेड हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ला मागे टाकत भारतातील सर्वात मोठी फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी (FMCG) बनली. AWL ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 54,214 कोटी रुपयांचा एकूण परिचालन महसूल नोंदवला आहे तर HUL ने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 51,468 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे.

  • अदानी विल्मार ही एक FMCG फूड कंपनी आहे
  • ‘फॉर्च्यून’ हा या कंपनीचा प्रमुख ब्रँड असून हा भारतात सर्वाधिक विकला जाणारा खाद्यतेल ब्रँड आहे.
  • कंपनी भारतातील १० राज्यांमध्ये २२ प्लांट चालवते.
  • अदानी विल्मारचे स्वतःच्या २२ प्लांट्स व्यतिरिक्त, अतिरिक्त ३६ भाडेतत्त्वावरील युनिट्सदेखील आहे.

परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:

  • अदानी समूहाची स्थापना: 1988
  • अदानी समूहाचे मुख्यालय: अहमदाबाद, गुजरात
  • अदानी समूहाचे अध्यक्ष: गौतम अदानी
  • अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक: राजेश अदानी

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद !!!

Leave a Comment