गुजरातमधील दाहोद येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. दाहोद जिल्हा दक्षिणी क्षेत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नर्मदा नदी खोऱ्यात बांधण्यात आली ज्याचा खर्च 840 कोटी रुपये होता.
या प्रकल्पांमध्ये इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) बिल्डिंग, स्टॉर्मवॉटर ड्रेनेज सिस्टीम, सीवरेज कामे, घनकचरा व्यवस्थापन प्रणाली आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- गुजरात राजधानी: गांधीनगर
- गुजरातचे राज्यपाल: आचार्य देवव्रत
- गुजरातचे मुख्यमंत्री: भूपेंद्रभाई पटेल
गुजरात राज्याची प्रतीके
- भाषा – गुजराती
- गीत – जय जय गरवी गुजरात
- नृत्य – दांडिया
- प्राणी – सिंह
- पक्षी – महा रोहित
- फुल – झेंडू
- फळ – आंबा
- वनस्पती – वड
- खेळ – कबड्डी
गुजरात मधील पर्यटन स्थळे
- गीर अभयारण्य : आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य
- गिरनार : जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान
- द्वारका : श्रीकृष्णाच्या देवालयासाठी प्रसिद्ध. द्वारका बेटा जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.
- मोढेराचे सूर्य मंदिर : भारतातील अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.
- राणी नी वाव : पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. हि युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.
- सोरटी सोमनाथ : येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.
- एकतेचा पुतळा : सरदार वल्लभभाई भाई पटेल यांचा पुतळा. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून याची उंची 182 मीटर आहे.
- करमाळा बदलतेय, अधिकाऱ्यांची गाव बनतात येथे – डॉ. विजयसिंह बाबासाहेब पाटील
- स्वातीला चक्क दोन विभागात नोकरी करण्याची संधी!
- वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा इक्वेडोर हा पहिला देश बनला