MPSC News

पचनसंस्था (Digestive System ) महत्वाचे मुद्दे

Digestive System information in marathi: आपण जगण्यासाठी जे अन्न खातो ते प्रामुख्याने जटील स्वरुपात असते. त्या अन्नापासून ऊर्जा मिळविण्यासाठी पहिले त्याचे पिष्ठमय स्वरुपातील अन्नात रुपांतर करावे लागते.

उत्सर्जन संस्था

  • आपल्या शरीरात तयार झालेले घटक व टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे कार्य उत्सर्जन संस्था करतात.
  • यामध्ये वृक्क, मुत्रवाहिनी, मुत्राशय आणि मुत्रोत्सर्जन मार्गाचा समावेश होतो.

Digestive System information in marathi

पचनसंस्था (Digestive System )

  • आपण जगण्यासाठी जे अन्न खातो ते प्रामुख्याने जटील स्वरुपात असते.
  • त्या अन्नापासून ऊर्जा मिळविण्यासाठी पहिले त्याचे पिष्ठमय स्वरुपातील अन्नात रुपांतर करावे लागते.
  • अशा स्वरुपात अन्नाचे रूपांतर करणारी आपल्या शरीरातील इंद्रीय संस्था म्हणजे पचन संस्था होय.
  • या पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश होतो.

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 04

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 03

अन्ननलिका (Alimentary Canal)

  • अन्ननलिकेची लांबी 32 फुट (950 सेंमी) एवढी असते.
  • अन्ननलिकेत पुढील भागांचा समावेश होतो.
  1. मुखगुहा
  2. ग्रसणी
  3. ग्रासिका
  4. जठर
  5. लहान आतडे
  6. मोठे आतडे
  7. मलाशय
  8. गुदद्वार

मुखगुहा (Mouth)

  • यामध्ये दात, लाळ, जीभ यांचा समावेश होतो.
  • अन्न पचनाची सुरुवात इथूनच होते.

दात

  • दात दंतीन नावाच्या टनक पेशीपासून बनलेले असतात आणि दातावरिल कडक आवरणाला इनॅमल असे म्हणतात.
  • पिण्याच्या पाण्यातील फ्लोरीनच्या जास्त प्रमाणामुळे हे इनॅमल नावाचे दातावरील आवरण नष्ट होऊन डेंटज फ्लूरोसिस हा रोग होतो, आणि फ्लोरीनच्या कमतरतेमुळे दंतक्षय हा रोग होतो.
  • मनुष्याला संपूर्ण आयुष्यात 52 दात येतात.
  • ‘ यामध्ये दुधाचे दात 20 असतात व ते 8 व्या महिण्यापासून येतात.

कायमस्वरुपाच्या दाताचे प्रकार व संख्या

  • पटाशीचे दात – 08
  • सुळे दात – 04
  • उपदाढा – 08
  • दाढा – 12
  • एकूण – 32

लाळ (Saliva)

  • लाळेमध्ये टायलीन हे विकर असून त्याचे कार्य-स्टार्चचे रुपांतर माल्टोजमध्ये करणे.

जीभ (Tongue)

  • आपल्या जीभेवर 3,000 स्वादकलिका असून त्या चव जाणण्याचे कार्य करतात.
  • जीभेच्या शेंड्यावर – गोड चवीची माहिती होते.
  • जीभेच्या आतील भागात – कडू चवीची माहिती होते.
  • जीभेच्या दोन्ही कडावर आंबट, खारट, तुरट चवीची माहिती होते.
  • जीभेच्या मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही.

ग्रसणी (Pharynx)

  • मुखगुहा व ग्रासिका यांच्यामधील भाग म्हणजे ग्रसणी होय.
  • प्रसणीमध्ये अन्ननलिका व श्वसननलिका यांची तोंडे (मार्ग) असतात.
  • चुकून श्वसननलिकेत अन्नाचे कण गेल्यास आपल्याला ठसका लागतो.

ग्रासिका (Oesophagus)

  • लांबी 25 सेंमी असून घशापासून ते जठरापर्यंत अन्न नेण्याचे काम करते.
  • यामध्ये अन्नाचे पचन व शोषण दोन्ही होत नाही.

जठर (Stomach)

  • जठराचा आकार इंग्रजी J या अक्षरा सारखा आहे.
  • यामध्ये जठर रस तयार होतो या जठर रसामध्ये विरल. हायड्रोक्लोरिक आम्ल असते व त्यामुळे अन्नाचे अंशतः पचन होते.
  • जठररसामध्ये रेनीन व पेप्सीन ही दोन विकरेही असतात.
  • रेनीन हे विकर फक्त लहान मुलामध्येच असते व त्यामुळे दुधाचे पचन होते.
  • पेप्सीन प्रथिनाचे रुपातर अमिनो आम्लामध्ये करते.
  • जठरामध्ये जवळपास 4 ते 5 तास अन्न थांबून राहते व येथे अन्न भरडल्या जाते.
  • जठरामध्ये अन्नाचे अंशतः पचन होते परंतु शोषण होत नाही.

लहान आतडे (Small Intestine)

  • अन्नाचे पुर्णतः पचन व शोषण लहान आतड्यामध्येच होते.
  • लांबी 5 ते 6 मीटर (20-25 फुट) असते.
  • लहान आतड्यात स्वादुपिंडरस व पित्तरस येऊन मिसळतो.
  • स्वादुपिंडरसामध्ये असणारे विकर अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन,

मोठे आतडे (Large Intestine)

  • या भागात फक्त पाण्याचे शोषण होते.
  • लांबी 1.5 मीटर असते.
  • मानवी शरीरातील बिनकामी अवयव अपेंडीक्स हा मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असतो.

वृक्क (Kidney)

  • आपल्या शरीरात दोन वृक्के असतात.
  • त्यांचा आकार घेवड्याच्या बिया सारखा असतो.
  • उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते.
  • युरिया, अमोनिया, युरिक अॅसिड इत्यादी रक्तामधील टाकाऊ पदार्थ वेगळे करुन. त्याचे उत्सर्जन करण्याचे कार्य वृक्क करते.
  • वृक्काच्या नेफ्रॉन या भागामध्ये मुत्र तयार होते.
  • नेफ्रॉन हा वृक्काचा कार्यात्मक व रचनात्मक भाग आहे.
  • प्रत्येक वृक्कामध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात.
  • वृक्क दररोज 190 लीटर रक्त गाळते.
  • एका मिनिटाला वृक्क 1100 ते 1200 मिली रक्त गाळते.
  • कॅल्शियम ऑक्झालेटमुळे मुतखडा (Kidney Stone) हो आजार होतो.
  • मुत्राचा PH 6 असतो.
  • वृक्काचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास नेफ्रॉलॉजी असे म्हणतात.
Arogya Sevak Question Paper Test 1Click Here
Arogya Sevak Question Paper Test 2Click Here
Arogya Sevak Question Paper Test 3Click Here
Arogya Sevak Question Paper Test 4Click Here
Arogya Sevak Question Paper Test 5Click Here
Arogya Sevak Question Paper Test 6Click Here
Arogya Sevak Question Paper Test 7Click Here
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button