तुम्हाला माहीत आहे का तागाचे शास्त्रीय नाव?

तुम्हाला माहीत आहे का तागाचे शास्त्रीय नाव? (Do you know the classical name of linen?)

शास्त्रीय नाव : कॉर्कोरस कॅप्स्युलॅरिस

Corchorus capasularis; Corchorus olitorius

इंग्रजी : ज्यूट, White Jute

तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो. फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि त्याच्या मुळांवरील गाठी नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात.

फ्लोएमपासून तयार केलेल्या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘बास्ट फायबर’ असेही म्हणतात. हा धागा कणखर, सहजासहजी न तुटणारा आणि लवचीक असतो.

सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने तंतुमय वनस्पतींना पाण्यात कुजवून त्यापासून धागे तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रियेला ‘रेटिंग’ म्हणतात.

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्ये ज्यूट उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग चालत असे. फाळणीनंतर ज्यूट शेती पूर्व बंगाल, सध्याच्या बांगलादेशमध्ये गेली आणि ज्यूटच्या गिरण्या पश्चिम बंगालमधील कलकत्ता तेथे राहिल्या. याचा फार मोठा फटका लाखो ज्यूट उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

Leave a Comment