MPSC News

International Everest Day: 29th May | आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस दरवर्षी 29 मे

International Everest Day: आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो. काठमांडू, नेपाळ आणि एव्हरेस्ट प्रदेशात मिरवणुका, स्मरणार्थ आणि विशेष कार्यक्रमांसह हा दिवस साजरा केला जातो. (International Everest Day is celebrated on May 29 every year. The day is celebrated with processions, commemorations and special events in Kathmandu, Nepal and the Everest region.)

आशियामधले सर्वेक्षण अधिकारी ब्रिटनचे सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचं नाव हिमालयातल्या या शिखराला देण्यात आलं. जगातलं सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट वर चढाई हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. 68 वर्षांपूर्वी 1953 मध्ये, कालच्या दिवशी सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट शिखरावर सर्वप्रथम सर केलं होतं. मानवाचं पाउल सर्वप्रथम एव्हरेस्टवर पडल्याच्या या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून नेपाळ सरकारनं हा दिवस एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

माउंट एव्हरेस्ट हे समुद्रसपाटीपासून जगातील सर्वात उंच पर्वत असून त्याची उंची 8,848 मीटर आहे. नेपाळीमध्ये सागरमाथा आणि तिबेटीमध्ये चोमोलुंगमा म्हणून ओळखले जाते.

१८३० ते १८४३ या काळात भारताचे सर्वेअर जनरल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांना आदरांजली म्हणून या पर्वताला ‘एव्हरेस्ट’ असे नाव देण्यात आले.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:

  • एव्हरेस्टचे नेपाळी नाव: सागरमाथा
  • तिबेटी नाव: चोमोलुन्ग्मा
  • नेपाळचे पंतप्रधान: केपी शर्मा ओली
  • अध्यक्ष: विद्या देवी भंडारी
  • नेपाळची राजधानी: काठमांडू

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न:

प्रश्न 1. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो?

  • 12 मार्च
  • 29 एप्रिल
  • 23 मे
  • 29 मे

योग्य उत्तर – 29 मे

प्रश्न 2. माउंट एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली महिला कोण होती?

  • ए. हिलरी
  • ज़ुंको ताबेई
  • संतोष यादव
  • बचेंद्री पाल

योग्य उत्तर – ज़ुंको ताबेई

प्रश्न 3. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण?

  • बचेंद्री पाल
  • सलोणी पाटील
  • मीनाक्षी लोंढे
  • टेणजीनग शेरपा

योग्य उत्तर – बचेंद्री पाल

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button