MPSC News

Khasdar Nilambit: कोणत्या नियमानुसार खासदारांचे निलंबन होते?

Khasdar Nilambit: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांवर मोठी कारवाई केली. राज्यसभा आणि लोकसभेतून विरोधी पक्षांच्या एकूण ७८ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. चर्चेत असणार विषय नेहमी महत्वाचा असतो. त्यामुळे सविस्तर वाचून घ्या.

लोकसभा अध्यक्षओम बिर्ला
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपतीजगदीप धनखड

लोकसभा (Khasdar Nilambit)

नियम 373 :

सदस्यांचे सभागृहातील वर्तन बेशिस्त असल्याचे अध्यक्षांना वाटल्यास त्याच तातडीने सभागृहातून बाहेर काढले जाते.

नियम 374:

अध्यक्षांच्या अधिकार आणि सूचनांचे उल्लंघन करीत सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणल्यास अधिवेशन कालावधीसाठी निलंबित केले जाते.

नियम 374 अ :

सदस्यावर गंभीर आरोप झाल्यास पाच बैठका किंवा अधिवेशन कालावधीसाठी निलंबित केले जाते.

राज्यसभा (Khasdar Nilambit)

नियम 255

सदस्याचे सभागृहातील वर्तन बेशिस्त असल्याचे सभापतींना वाटल्यास त्याच तातडीने सभागृहातून बाहेर काढले जाते

नियम 256

सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत असल्यास अधिवेशन कालावधीसाठी निलंबित केले जाते.

निलंबनानंतर काय?

  • निलंबन कालावधी खासदारांना संसदेत व समितीच्या बैठकींना उपस्थित राहता येणार नाही.
  • एखाद्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी ते सूचना मांडू शकत नाहीत.
  • विचारलेल्या प्रश्नांना उत्तर मिळवण्याचा अधिकार गमावतात.

घटनेच्या कलम 122 नुसार देणे केलेल्या कारवाईवर कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button