MPSC News

MPSC News : MPSC Book List 2024 Free

MPSC News : MPSC Book List – MPSC Pree मध्ये एकूण दोन पेपर असतात, पेपर एक मध्ये एकूण जवळपास ७ विषय असतात, त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडोमोडी इत्यादी असतात. आज आपण महत्वाच्या पुस्तांकाची यादी तयार केली आहे. राज्यसेवा परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम MPSC Syllabus येथे बघू शकता. MPSC Book List (MPSC Rajyaseva Book List) पाहाण्याआधी काही महत्वाचे पॉइंट आहेत ते सुद्धा वाचा.

MPSc Book List For Prelims

HistoryState Board Books
Brief History of India- Spectrum
Aadhunik Maharashtra Itihas- Anil Katare.
NCERT- 12th standard
अनिल कटारे (selective)
रंजन कोळंबे इतिहास
GeographyState Board Books- 7th to 12th standards
Certificate of Physical geography – G. C. Leong
Bhugol ani Paryavaran- A.B. Sawadi
Indian PolityState Board Books
NCERTs 11th and 12th standards
Lakshmikant
रंजन कोळंबे
EconomyRamesh Singh’s Indian Economy (Selective reading)
NCERTs- 11th to 12th standards
कोळंबे सर
देसले सर
Economic Survey of MH (selective), India year book (selective)
EnvironmentShankar IAS book (English)
तुषार घोरपडे – पर्यावरण
ScienceState Board books- 8th to 10th standards
General Science- Lucent
भस्के सर / अनिल कोलते सर
Current Affairsचालू घडामोडी – Simplified Publication
Loksatta Newspaper
MPSCNews website
Loksatta Newspaper
Yojana Magazine
CSATAnalytical Reasoning by M K Pandey
CSAT Simplified by थोरबोले सर (सरावासाठी)
RS AGRAWAL (for practice If Necessary)

MPSC News – MPSC Book List in Marathi

MPSC Book List History (इतिहास)

  • 6 वी ते 11वी क्रमिक पुस्तके (selective)
  • 6th to 12 th NCERT books (selective)
  • Grover
  • Spectrum’s modern history
  • अनिल कटारे (selective)
  • भिडे पाटील
  • रंजन कोळंबे इतिहास
  • 12th Polity NCERT-Politics since Independence (very imp)

MPSC Book List Geography (भूगोल)

  • 4th to 12th MH state board books (very imp)
  • 6th to 12th Ncert books (very imp)

(टीप:वरील दोन्ही वाचून झाल्यानंतर त्यांच्या एकत्र notes बनवाव्या आणि नंतर या नोट्स मध्ये आवश्यकतेनुसार इतर पुस्तकातून माहिती add करत जावी.)

  • G.C.Leong
  • खतीब (selective)
  • सवदी सरांची पुस्तके (ही खूप मोठी पुस्तक आहेत संपूर्ण वाचण्याची गरज नाही यातून महत्वाचे आणि Syllabus चा cover न झालेला part करावा उदाः लोकसंख्या, नद्या, डोंगर, घाट, रस्ते इत्यादी)

MPSC Book List Remote sensing

last years questions, Geography NCERT & Internet (कमी output असलेला घटक आहे हा, यावर जास्त वेळ घालवू नये.)

MPSC Book List Environment

MPSC Book List Krushi Ghatak (कृषी घटक)

  • ११ वी आणि १२ वी MH state board books (selective)
  • Arun katyayan vol -1(selective)
  • Old Question paper (very imp)
  • दररोजच्या माहिती साठी कृषिकिंग टेलिग्राम पहा

MPSC Book List Polity (GS-2)

  • M Laxmikant (very imp/base book)
  • रंजन कोळंबे (M laxmikant मध्ये नसलेले आणि महाराष्ट्राशी संबंधित point यातून करणे)
  • M Laxmikant Governance in india (3 to 8 chapter) (very imp)

MPSC Book List Polity

  • पंचायतराज किशोर लवटे
  • कायदे – ministry च्या website वरून pdf डाउनलोड करणे आणि त्यावर unique academy च्या पुस्तकातून तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेतील extra माहिती add करणे
  • M Laxmikant ची question bank (If required)
  • unique academy polity (part 1 आणि part २) ( ही खूप मोठी पुस्तक आहेत संपूर्ण पुस्तक वाचण्याची गरज नाही, यातून महत्वाचे आणि Syllabus चा cover न झालेला part उदा: शेरीफ, विधानसभा समित्या, SDO, प्रसारमाध्यमे, Official secret act, पुरावा कायदा, प्रशासकीय कायदा इत्यादी घटक करून घेणे)
  • LBSNAA, Yashada, PCI, SVPNPA, इत्यादी महत्वाच्या Website पाहून घेणे
  • 12th Polity NCERT-Politics since Independence (very imp)

MPSC Book List HRD (GS-3)

  • रंजन कोळंबे (very imp)
  • किरण देसले भाग २ (very imp)
  • पृथ्वी परिक्रमा व gktoday website वरून या विषयाशी related चालू माहिती घ्यावी
  • M Laxmikant Governance in india-rights etc (selective)
  • Economic Survey of MH (selective), India year book (selective)
  • visit some imp websites (If time permits)

MPSC Book List Economy (GS-4)

  • कोळंबे सर (very imp)
  • Relevant ncert book
  • देसले सर (खूप मोठे पुस्तक आहे. संपूर्ण वाचण्याची गरज नाही. selective वाचणे)
  • Budget : पृथ्वी चे मासिक आणि त्यावेळच्या वर्तमानपत्रातून short मध्ये करून घेणे संपूर्ण बजेट वाचण्याची आवश्यकता नाही.
  • Economic Survey of MH (selective), India year book (selective)

MPSC Book List Technology (GS-4)

  • Energy-कोळंबे सर (selective)
  • Computer & ICT-last yr questions, internet search
  • Space technology कोळंबे सर, पृथ्वी परिक्रमा मधून current issue, ISRO ची website,internet search
  • Biotechnology -last yr questions, internet search, wikipedia… (कमी output असलेला घटक आहे हा यावर जास्त वेळ घालवू नये.)
  • Nuclear policy – कोळंबे सर, पृथ्वी परिक्रमा मधून current issue, last yr questions, internet search, wikipedia…

Disaster Management विज्ञान आणि भूगोल च्या NCERT तसेच स्टेट बोर्ड च्या पुस्तकातून माहिती एकत्र करणे, जुने प्रश्न, इंटरनेट, wikipedia.

MPSC Book List Chalu Ghadamodi

MPSC Book List Science (विज्ञान)

  • 5th to 10th state board book
  • 5th to 10th NCERT book
  • 11th & 12th state board -PCB (selective)
  • 11th & 12th ncert -PCB (selective)
  • भस्के सर

MPSC Book List CSAT

  • जुने पेपर वेळ लावून वारंवार सोडवणे
  • CSAT Simplified by थोरबोले सर (सरावासाठी)
  • RS AGRAWAL (for practice If necessary)
  • या पेपर साठी जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे त्यामुळे PSI/STI/ASO/Forest etc चे पेपर सुद्धा सोडवावे
  • समजत नसलेले घटक youtube वर पाहून घेणे

MPSC Book List Objective Marathi (मराठी)

  • मो रा वाळंबे (base book /very imp)
  • बाळासाहेब शिंदे
  • शब्दार्थ Ksagar Publication
  • जुने पेपर वारंवार सोडवणे (very imp)
  • मो रा वाळंबे सरांचे सराव पेपर सोडवणे

MPSC Book List Objective English

  • Balasaheb shinde (base book)
  • M J Shekh (unique academy) (selective)
  • सुदेश वेलापुरे सरांचे स्पष्टीकरण असलेले पुस्तक (very imp)
  • जुने पेपर वारंवार सोडवणे (very imp)

MPSC Book List Written Marathi & English :- मराठी आणि इंग्रजी

  • मो रा वाळंबे – मराठी साठी
  • English – मराठीतलाच निंबध इंग्रजी मध्ये लिहिण्याचा सराव करावा

पूर्व परीक्षा झाल्यावर प्रत्येक आठवड्यात १ जुना पेपर वेळ लावून सोडवावा आणि मित्राकडून/ Toppers कडून / शिक्षकांकडून / स्वतः तपासून त्याप्रमाणे सुधारणा कराव्या.

MPSC Interview

  • MPSC Interview ची तयारी करताना MPSC Interview Question (राज्यसेवा मुलाखत) जुन्या Transcript पाहून घ्या.
  • जुन्या Transcript तुम्हाला MPSC News या website वर Interview यामध्ये तुम्हाला सर्व Transcript मिळून जातील.

काही महत्वाचे पॉइंट / सर्वसाधारण सूचना

स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका (MPSC Old Question Papers) (last 5 yrs) या सर्वात मोठ्या मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका या खूप महत्वाच्या आहेत. अभ्यास करत असताना जुन्या प्रश्नपत्रिका (MPSC Old Question Papers) आणि अभ्यासक्रम (MPSC Syllabus) यांचा सातत्याने संबंध जोडण्याचा प्रयत्न करावा. Booklist मधील काही ठराविक पुस्तके सोडली तर सर्वच पुस्तके सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्याची आवश्यकता नसते.

प्रत्येक विषयासाठी एक किंवा दोन पुस्तकं base पुस्तकं म्हणून वापरावी आणि त्या विषयाच्या इतर पुस्तकांतुन महत्वाची माहिती या base म्हणून वापरलेल्या पुस्तकात add करत राहावी. माहिती कोणती add करावी हे जुने प्रश्न आणि MPSC Syllabus पाहून ठरवावे. जास्त पुस्तके वाचण्यापेक्षा ठराविक पुस्तकेच वारंवार वाचावी. (Base म्हणून वापरलेलं पुस्तक परफेक्ट झाल्याशिवाय इतर पुस्तक वापरू नये.)

स्पर्धा परीक्षांची (राज्यसेवा/PSI/STI/ASO/forest etc.) तयारी तुम्ही घरी राहून करू शकता. किती तास अभ्यास करता यापेक्षा कसा अभ्यास करता याला जास्त महत्व आहे. अभ्यासात सातत्य असणे गरजेचे आहे. साधारणतः दररोज ६-७ तास तरी अभ्यास करणे गरजेचे आहे आणि असे महिन्यातून किमान २५ दिवस तरी अभ्यास व्हायला पाहिजे. अभ्यास तुम्ही नोट्स काढून किंवा underline /highlight करून पण करू शकता. प्रत्येक विषयाच्या नोट्स काढण्याची आवश्यकता नसते. (उदा: राज्यघटना, मराठी इत्यादी विषयाच्या नोट्स नाही काढल्या तरी चालते.)

पूर्व परीक्षेचा Syllabus हा व्यवस्थित Define केलेला नाही तरी जुने प्रश्न पाहून स्वतः च Syllabus define करणे. तसेच पूर्व आणि मुख्य ची booklist जवळ पास सारखीच आहे त्यानुसार आवश्यक books add करावे किंवा वगळावे. सर्व यशस्वी उमेदवारांची MPSC Book List पाहिल्यास सर्वसाधारणपणे सर्वांची Booklist सारखीच असल्याचे आढळून येते. त्यामुळे जे पास झालेत ते हेच पुस्तके वापरून पास झाले आहेत म्हणून हेच पुस्तके व्यवस्थित करा. या booklist मध्ये आवश्यकता वाटल्यास काही books तुम्ही add करू शकता किंवा वगळू शकता. (कुठलेही नवीन पुस्तक वापरण्याअगोदर कमीत कमी 4 Toppers नी ते पुस्तक Recommend केलेले आहे का याची खात्री करावी तसेच त्या पुस्तकातून प्रश्न पडलेले दिसतात का हे पाहिल्यानंतरच पुस्तक हाती घ्यावे.)

परीक्षांची तयारी करताना मराठी तसेच इंग्रजी माध्यमाचा वापर करा. फक्त एकाच भाषेचा वापर करणे टाळा. दोन्ही भाषा व्यवस्थित जमायला हव्या. दोन्ही माध्यमाचा वापर केल्याने त्या-त्या भाषेतील शब्दसाठा वाढतो याचा फायदा Marathi-English च्या Written तसेच Objective पेपर ला होतो. Combined Exam (PSI/STI/ASO) ची तयारी करणाऱ्यांनी या Booklist मधील पुस्तके Combined Exam चा Syllabus आणि जुन्या प्रश्नपत्रिका पाहून आवश्यकतेनुसार निवडावे / वगळावे.

माघील ३/४ वर्षात महाराष्ट्र शासनाची नवीन क्रमिक (शालेय ) पुस्तके आली आहेत त्यात परीक्षेशी संबंधित (exam oriented) माहिती कमी आहे, त्यामुळे जुनी पुस्तके आधी वाचावी आणि वेळ मिळेल तसा नवीन पुस्तके पण वाचून घ्यावी (प्रश्न दोन्ही पुस्तकातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.) सहसा एक Subject perfect झाल्याशिवाय दुसरा Subject घेऊ नये परंतु एकच Subject daily वाचून कंटाळा येत असेल तर दुसरा Subject घेतला तरी चालेल. (daily 2 पेक्षा जास्त Subject घेणे टाळावे.)

राज्यसेवा मुख्य परीक्षेला । महिना बाकी असताना नवीन साहित्य वाचू नये. या शेवटच्या एक महिन्यामध्ये फक्त Revision करावी. Combine आणि राज्यसेवा पूर्व च्या बाबतीत २०-२२ दिवस बाकी असताना Revision सुरु करावी. कुठल्याही विषयाची सुरुवात ही basic books पासूनच करावी मगच नंतर reference books वाचावे. किती विद्यार्थी परीक्षेला बसतात हे पाहून घाबरू नये, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना यश हे मिळतेच.प्रत्येक विषयाला वेळ देऊन सर्व विषय cover करण्याचा प्रयत्न करावा. अभ्यास करत असताना वेळेचे तसेच विषयाचे सुद्धा नियोजन असावे.

काही गोष्टी या पाठ च कराव्या लागतात परंतु कोणत्या गोष्टी पाठ कराव्या आणि कोणत्या करू नये हे जुने पेपर पाहून ठरवावे. (सरसकट पाठ करत बसू नये) अभ्यासाचा Fix असा काही Time नसतो. (अभ्यास पहाटेच करावा असेही काही नाही दिवसभरात किंवा रात्री कधीही केला तरी चालतो.) स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तब्येतीची पुरेशी काळजी घ्यावी तसेच दररोज किमान ७-८ तास तरी झोप घ्यावी. (Remember: Health is Wealth)

सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद !!

Daily Free Test क्लिक करा
MPSC News Whatsapp क्लिक करा
MPSC News Telegram क्लिक करा
MPSC News Facebook क्लिक करा
MPSC News Instagram क्लिक करा
MPSC News You Tube क्लिक करा
MPSC Official क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button