२३ मे – जागतिक कासव दिन | May 23 – World Tortoise Day

कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैव साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासव साधारण सात प्रकारच्या जातीत आढळते.

भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महत्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे की कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट, मान कवच्यामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम, क्रोध, मद,मोह,मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.

महत्वाचे 

  • जगभरातील कासव आणि त्यांचे अदृश्य निवासस्थान यांचे संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • कासव आणि कासवच्या सर्व प्रजातींच्या संरक्षणासाठी 1990 मध्ये स्थापन झालेली अमेरिकन कासव बचाव ही ना-नफा
    संस्था 2000 पासून हा दिवस साजरा करीत आहे.
  • 2022 थीम : शेलेब्रेट!’ प्रत्येकाला कासवांवर प्रेम आणि जतन करण्यास सांगते.
  • 2021 वर्ल्ड टर्टल डे ची थीम “कासवा रॉक!” आहे.
  • अमेरिकन कासव बचावचे संस्थापक: सुसान तेललेम आणि मार्शल थॉम्पसन.
  • अमेरिकन कासव बचाव कॅलिफोर्नियाच्या मालिबूमध्ये आहे.
  • अमेरिकन कासव बचाव संस्था 1990  मध्ये स्थापन करण्यात आली.
  • ऑपरेशन कुर्मा : भारतामध्ये राबवलेले ऑपरेशन कासवाच्या संरक्षणासाठी

जहाजातील तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू, मानवाकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठींचा दागिन्यांसाठी वापर, अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होते आहे. कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.

  1. जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो?
  • 19 मे
  • 21 मे
  • 23 मे
  • 25 मे

Correct Answer : C

कासव आणि कासवांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 23 मे या दिवशी जागतिक कासव दिन पाळतात. या दिनाची स्थापना अमेरिकन टॉरटॉइज रेसक्यू या संस्थेनी 1990 साली केली होती.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद !!!

Leave a Comment