वनरक्षक भरतीबद्दल माहिती : नमस्कार मित्रांनो आज आपण वनरक्षक भरतीसाठी महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो तुम्हाला सहजा सहजी उपलब्ध होत नाही. वनरक्षक भरतीसाठी 12 वी पास आवश्यक आहे.वनरक्षक भरतीसाठी उमेदवार हा 18 वर्षांपेक्षा कमी नसावा व 25 वर्षांपेक्षा जास्त नसावा. वयोमर्यादा काही बाबतीत शिथीलक्षम.
वनरक्षक भरती : वनविकासाचा इतिहास (स्वातंत्र्यापूर्वी)
- 1846 -जगातील पहिले सागाचे वनरोपण केरळमध्ये झाले.
- 1847 – मुंबई प्रांतासाठी पुणे येथे भारतातील पहिले वरिष्ठ वनधिकाऱ्याचे कार्यालय सुरू झाले. भारताचे पहिले संचालक (Inspector General of Forest) डिट्रीच बँडील
- 1855 – लॉर्ड डलहौसी यांनी एक विस्तृत ज्ञापन काढून भारतीय वनधोरणाचा प्रथम उच्चार केला होता.
- 1864 – वनखात्याची निर्मिती
- 1865 – भारतातील शासकीय वनांचे सर्वेक्षण व सीमांकनाचे काम सुरू. पहिला भारतीय वनविषयक कायदा करण्यात आला.
- 1867 – भारतीय वन सेवा सुरुवात.
- 1872 – भारतात वनशिक्षण सुरू झाले.
- 1878 – फॉरेस्ट स्कूल डेहराडून येथे सुरू.
- 1883 – बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबईला स्थापन.
- 1892 – ब्रिटिश भारतातील पहिले राष्ट्रीय वनधोरण (Forest Policy) ठरविण्यात आले.
- 1898 – वेडनअंगल अभयारण्य तामिळनाडूत भारतातील पहिले
- 1848 – केंद्रीय वन मंडळ स्थापना
- स्वातंत्र्यपूर्व काळी भारतात 75.06 दशलक्ष हेक्टर क्षेत्र वनाखाली होते.
वनरक्षक भरती : वनविकासाचा इतिहास (स्वातंत्र्यानंतरचा)
- 1952 – स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रीय वनधोरण जाहीर. या धोरणानुसार जंगलाखालील क्षेत्र हळूहळू वाढवून ते 100 दशलक्ष हेक्टर करण्याचे ठरविण्यात आले.
- 1952 – प्रथम वनमंत्री श्री. के. एम. मुन्शी यांनी वनमहोत्सव हा वार्षिक कार्यक्रम सुरू केला.
- 1952 – भारतात वनाखाली आदर्श प्रमाण डोंगराळ भागात 60%, इतरत्र 20 टक्के व एकूण देशात 33.3 टक्के होते.
- 1966 – भारतीय वनसेवा पुन्हा सुरू
- 1968 – चॅम्पीयन सेठ यांनी भारतीय वनांचे 16 प्रकारात वर्गीकरण केले.
- 1976 – राष्ट्रीय कृषी आयोगाने वन संपत्ती विकासासाठी वने व वनव्यवस्थेचा उत्तम आढावा घेऊन अनेक शिफारशी करणारा अहवाल सादर केला.
- 1976 – वनविषयाचा समवर्ती सूचित समावेश
- 1982 – सामाजिक वनिकरण (Social Forestry) संकल्पना 1976 च्या राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींवरून (सहाव्या पंचवार्षिक योजना काळात )
सदर माहिती “स्मार्ट स्टडी वन विभाग (वनरक्षक व सर्वेक्षक) प्रश्नपत्रिका संच” या पुस्तकतील आहेत. जर तुम्ही वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर पुस्तक नक्की घ्या. खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे.
वनरक्षक भरती – 42 प्रश्नपत्रिका संच
महाराष्ट्र वन विभाग तर्फे घेण्यात येणाऱ्या वनरक्षक, सर्वेक्षक, वनपाल, भांडारपाल, लेखापाल, सर्व्हेअर तसेच इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
वैशिष्ट :-
- महाराष्ट्र व भारत वन विभागाविषयी विशेष पुरवणी
- महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या 22 प्रश्नपत्रिका
- 20 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा (पूर्णतः बदलत्या पॅटर्ननुसार) समावेश
- प्रश्न – 5100+
- प्रश्नपत्रिका – 42
लेखन व संकलन – विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन).

1 thought on “वनरक्षक भरती : वनविकासाचा इतिहास (स्वातंत्र्यापूर्वी – स्वातंत्र्यानंतरचा)”