महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- ब पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (पूर्व) स्पर्धा परीक्षा

Maharashtra Subordinate Services, Gr. B
(Non-Gazetted) (Pre) & (Main) Competitive Exam

परीक्षेचे टप्पे –

  1. संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण
  2. मुख्य परीक्षा – २०० गुण (पेपर क्र.-१ संयुक्त व पेपर क्र.२ स्वतंत्र)

पूर्व परीक्षा पॅटर्न –

  • प्रश्नपत्रिकेची संख्या – एक.
  • विषय व संकेतांक – सामान्य क्षमता चाचणी | (संकेतांक क्र. ०१२)
  • प्रश्नसंख्या – १००
  • एकुण गुण – १००
  • दर्जा – पदवी
  • माध्यम – मराठी व इंग्रजी
  • परीक्षेचा कालावधी – एक तास
  • प्रश्नपत्रिकेचे स्वरुप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

नकारात्मक गुणदान –

  1. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
  2. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
  3. वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  4. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

सामान्य क्षमता चाचणी –

  1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
  2. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).
  3. इतिहास -आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.
  4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. इत्यादी.
  5. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  6. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
  7. बुध्दिमापन चाचणी व अंकगणित
      • बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
      • अंकगणित -बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

Download PDF

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे.

धन्यवाद !!!

Leave a Comment