Krushi Sevak Syllabus 2023: महाराष्ट्र कृषी विभाग “कृषी सेवक” (Krushi Sevak) परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळेच तुमच्यासाठी महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम PDF मध्ये देत आहोत. या लेखात महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
Krushi Sevak Syllabus 2023: (गट-क संवर्ग) अभ्यासक्रम
1 | सामान्य ज्ञान | 20 प्रश्न | 20 गुण |
2 | बुध्दीमत्ता चाचणी | 20 प्रश्न | 20 गुण |
3 | मराठी भाषा | 20 प्रश्न | 20 गुण |
4 | इंग्रजी भाषा | 20 प्रश्न | 20 गुण |
5 | तांत्रिक प्रश्न | 60 प्रश्न | 120 गुण |
Total | 100 प्रश्न | 200 गुण |
अ) कृषि सेवक लेखी परीक्षेकरिता लेखी परीक्षेचा पाठयक्रम अभ्यासक्रम
- सामान्य ज्ञान – २० प्रश्न
- बुध्दीमत्ता चाचणी – २० प्रश्न
- मराठी भाषा – २० प्रश्न
- इंग्रजी भाषा – २० प्रश्न
ब) कृषी सेवक लेखी परीक्षेकरिता तांत्रिक – ६० प्रश्न
मृद शास्त्र व्यवस्थापन –
- जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म – जमिनिचे प्राकृतिक व भौतिक गुणधर्म, जमिनीचा पोत, घडण, रचना, घनता, पोकळी किंवा सच्छिद्रता, तापमान, रंग, स्थिरता, जमिनिचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा सामु जमिनीची विद्युतवाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी, जमिनीचा प्रतिबंधक योग्यता इत्यादी.
- जमिनीचे जैविक गुणधर्म, सुक्ष्म जीवजंतू व त्यांचे उत्पादन क्षमतेशी असलेले संबंध, जमिनीतील आवश्यक अन्नद्रव्ये, मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये, सोबत कार्य व त्यांच्या कमतरतेची सविस्तर लक्षणे.
- जमिनीतील पाण्याचे प्रकार आणि महत्व, पाण्याचे कार्य, जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याची क्षमता, जमिनीतील पाण्याचे नुकसान आणि पाण्याचे चक्र, जमिनीचा निचरा, निचरा पध्दती, अतिरिक्त पाण्याचे पीकावर व जमिनीवर होणारे परिणाम.
- जमिनीची मशागत, प्रकार, जमीनिसाठी लागणारी अवजारे व त्यांचा उपयोग, जमिनीची मशागत व तिचे फुल, मशागतीचे उद्देश, मशागतीच्या कामाचे प्रकार व त्यासाठी लागणारी निरनिराळी अवजारे त्यांचा वापर.
- माती परीक्षण, महत्व उद्देश
जमीन व्यवस्थापन
- जमीन व्यवस्थापन, जमिनीची धूप होण्याची कारणे,जमीन धूपीचे निरनिराळे प्रकार व त्यामुळे होणारे नुकसान, जमीन धूप थांबविण्यासाठी उपाय कोणते केले जातात.
- भुमि व जलसंरक्षणाच्या आवश्यक पध्दती, व्यवस्थापन करण्याच्या पध्दती, त्यामध्ये यांत्रिकी पध्दती, भूमी सुधारण्याच्या व संरक्षणाच्या पध्दती, व्यवस्थापन पध्दती, यांत्रिकी पद्धती, भुमी सुधारणा व संरक्षणाच्या निरनिराळया शासकिय योजनांचा अवलंब.
- सेंद्रिय खते, खातांचे प्रकार व खातांचे गुणधर्म, शेणखत बनविण्याच्या सुधारित पध्दती, कंपोष्ट खत बनविण्याच्या पध्दती, जैविक खते म्हणजे काय सोबत त्याचे फायदे कोणते आहेत.
- रासायनिक खतांचे प्रकार व त्यामुळे होणारे पारिनाम , रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी निरनिराळी उपाययोजना, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा, रासायनिक खतांचा समतोल रखण्यासाठी कोणत्या खतांचा वापर करावा, खते देण्याच्या पध्दती, खते घालताना कोणती काळजी घ्यावी.
- कोरडवाहू क्षेत्राची व्यवस्था, पाणलोट क्षेत्राचा कोरडवाहू शेतीमधील सहभाग (पाणी अडवा पाणी जिरवायोजना) , पाणलोट क्षेत्राच्या पीकासाठी सामाजिक वनीकरण, मृद संधारण विभाग, फलोद्यान विभाग आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग यामध्ये कोणत्या संस्थांचा सहभाग असतो.
- जमिन आणि पाणी देण्याचा संबंध पाणी देण्याच्या पध्दतीकोणत्या आहेत, त्यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन व बायऑल सिंचन पध्दती, यांचा वापर कसा करावा, अनुदान कसे मिळवावे.
पीक संवर्धन-
- पीकसंवर्धन, पिकांचे वर्गीकरण, पिकांसाठी आवश्यक हवामान आणि हंगाम
- बियाणे, बियाणाचे गुणधर्म, बियान्यांचे प्रकार, बियाच्या उगवणसाठी लागणाऱ्या कोणत्या आवश्यक गोष्टी असतात.
- पीकाच्या वाढीसाठी आवश्यक जमीन, पाणी आणि हवामान कसे असावे.
- तृणवर्गीय पिके, कडधान्य वर्गीय पिके, गळीतधान्य, हिरवळी खताची पिके कोणती आहेत.
- रोग नियंत्रणाची, कीड नियंत्रणाची सर्वसाधारण तत्त्वे कोणती आहेत.
- जैविक किडी / रोगनियंत्रण, एकात्मिक किड व्यवस्थापन व रोगनियंत्रणा साठी आवश्यक उपाययोजना.
- कीटक नाशके व बुरशी नाशकांचा अभ्यास
- साठवलेल्या धान्यातील किडी सोबत त्यांचे नियंत्रण कसे करावे
- बिजोत्पादन तंत्रप्रमाणीकरण, विलगीकरण, संकर कार्यक्रम, बिजोत्पादनाचे टप्पे कोणते आहेत.
पीक संवर्धन व शेती पुरक उद्योग-
- निरनिराळया पीकपद्धती
- पीकाचे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन म्हणजे काय?
- विहिरीतील पाणी कसे मोजतात, पीकांना पाण्याच्या वेळा कश्या ठरतात. सोबत त्याचे निकष, पाणी देण्याच्या निरनिराळया पद्धती
- आळींबी उत्पादनाचे तंत्र, खाण्या योग्य अळींबीचा अभ्यास आणि वर्गीकरण, अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य कोण कोणते लागते त्याविषयी माहिती. अळिंबीची काढणी आणि विक्री, प्रक्रिया आणि टिकविण्यण्याच्या पद्धती कोणत्या आहेत.
- रेशीम उत्पादनाची ओळख, लागणारे साहित्य, कोणती रेशीम चांगल्या प्रतीची असते.
उद्यान विद्या रोपवाटिका आणि फळबाग व्यवस्थापन-
- महाराष्ट्राचे हवामानानूसार पडलेले विभाग.
- फळबागे साठी आवश्यक असणाऱ्या बाबी, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, जमिनीची निवड, योग्य जातीची निवड, पाणीपुरवठा, बाजारपेठ या बाबीचा अभ्यास करणे.
- फळबाग लागवड व व्यवस्थापन पाणी / खते देण्याच्या पध्दतींचा योग्य वापर.
- सेंद्रिय खताचा निर्यातक्षम फळांच्या निर्मितीमध्ये महत्व
- आंतर मशागत आणि पाण्याचा निचरा करण्याच्या पध्दती
- तणाचा बंदोबस्त
- बहार धरणे पध्दती मृग, हस्त व आंबेबहार
- छाटणी आणि वहण देण्याचे उद्येश व पध्दती
- फुल धारणा आणि फुल धारणेवर होणारे परिणाम, हवामान, रासायनिक द्रव्ये
- फळांची गळ, विरळणी, पक्वता, काढणीची योग्य अवस्था ओळखणे, प्रतवारी करणे, पॅकींग, वाहतूक व विक्री व्यवस्था या बाबी.
- कोरडवाहू फळपिकांचे व्यवस्थापन
- महाराष्ट्राच्या महत्वाच्या समशितोष्ण व उष्णकटिबंधातील आणि फळ झाडांची लागवड ५.६ फळपिका वरीलरोग व किडीं यांचे नियंत्रण
- शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजना
- रोपवाटिका व्यवस्थापन भाजीपाला व फुलझाडे यांच्या अभिवृध्दीचे प्रकार बियापासून शाकीय अभिवृध्दी पध्दती, फायदेव तोटे
- मातृ वृक्षाचे महत्त्व व निगा
- हरितगृह, तुषारगृह यांचे आधुनिक शेतीतील महत्त्व, प्रकार व आकार व उभारणी
उद्यानविद्या भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन
- भाजी पालयाचे वर्गीकरण
- प्रमुख भाजीपाल्याची लागवड- पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय
भाज्या, शेंगवर्गीय भाज्या, मुळ वर्गीय भाज्या, कंद वर्गीय भाज्या आणि कोबी वर्गीय भाज्या, बहुवर्षीय भाज्या - फुलशेती महत्त्व व लागवडीस असलेला वाव
- पुष्प उत्पादनात अवलंबिल्या जात असलेल्या खास बाबी – हरित गृहातील
फुलशेती पुष्प प्रदर्शनासाठी फुलांची निवड व तयारी - फुलपिकांच्या अभिवृध्दीच्या पद्धती
- महत्त्वाच्या फुलझाडांची लागवड
- फळे आणि भाजीपाला टिकविण्याच्या विविध पद्धती
कृषी विस्तार
- विस्ताराची मुलतत्त्वे, वैयक्ति कसंपर्क शेतावर व घरी भेट, दूरध्वनी वरील चर्चा, वैयक्तिक चर्चा
- कार्यालयीन भेट गटसंपर्क सभा, प्रात्यक्षिके, शैक्षणिक सहल, गट चर्चा
- समुह संपर्क – शेतकरी मेळावे. कृषि दिन, प्रदर्शन, रेडिओ, दूरदर्शन, सभा.
- शेती विषयक वाडमय घडी पत्रीका, परिपत्रक, पुस्तिका, भित्तीपत्रक, तक्ते, आलेख, बातमी, नमुने छायाचित्र
- दृकश्राव्य साधने रेडिओ, दुरदर्शन, टेपरेकॉर्डर, चल चित्रपट, स्लाइड शो, व्हिडिओ कॅसेट, नाटक, तमाशा, कीर्तन.
- संगणक – रचना, कार्य, उपयोग, माहिती साठविणे, माहितीची देवाणघेवाण इ.
- विस्तार कार्यकर्ता – गुणकर्तव्ये व प्रकार
- कार्यक्रमाचे नियोजन तत्त्वे, पायऱ्या आणि फायदे
- विकास योजना माहिती, उद्देश, लाभार्थी, प्रशासन आणि फायदे, तोटे, कोरडवाहू क्षेत्र विकास योजना (डी.पी.ओ.पी), निर्धारीत लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम, आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम, डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, एकात्मिक बळ विकास योजना, फळबाग विकास योजना, बहुविध पीक योजना, एकात्मिक कडधान्य सुधार योजना, एकात्मिक तेलबिया सुधार कार्यक्रम, राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, एकात्मिक चारा विकास योजना, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम, कृषी विज्ञान केंद्र
- महत्त्वाचे शेती विषयक कायदे- बि-बियाणे कायदा, रासायनिक खत नियंत्रण कायदा,
कीटकनाशक कायदा, जंगल कायदा, तुकडे बंदी व तुकडे तोड कायदा.
कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन :-
- कृषी व्यवसायात वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व
- कृषी व्यवसायात पत पुरवठयाची भूमिका
- कृषी पत पुरवणा-या संस्था
- कृषी पत प्रस्ताव (आर्थिक सुसज्जते साठी कृषी पत चाचणी)
- कृषी व्यवसाय विश्लेषण
कृषी विपणन :-
- शेतीमाल विक्री व्याप्ती आणि महत्त्व
- शेतीमालाच्या बाजारपेठेचे प्रकार
- शेतीमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम आणि संस्था
- शेतीमाल विक्रीच्या समस्या