MPSC News

Maharashtra Public Service Commission (MPSC JOB) विविध पदांच्या एकूण ६३ जागा

Maharashtra Public Service Commission: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा – २०२१ करिता एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Public Service Commission

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२१
  • शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

Maharashtra Public Service Commission: निवड प्रक्रिया :-

  • सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र न्यायिक सेवा नियम, २००८ अथवा त्यानंतर वेळोवेळी शासनाकडून करण्यात आलेल्या सुधारणा तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
  • पात्रतेसंदर्भात विहित अर्हता, अनुभव तसेच इत्यादी बाबी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखत अथवा निवडीसाठी पात्र असणार नाही.
  • आयोगाने त्या त्या वेळी निश्चित केलेल्या धोरणानुसार उमेदवार मुलाखत अथवा निवडीसाठी पात्र असल्यासच त्याचा मुलाखत अथवा निवडीसाठी विचार करण्यात येईल.
Maharashtra Public Service Commission
Maharashtra Public Service Commission

Maharashtra Public Service Commission: परीक्षेचे टप्पे:-

प्रस्तुत मुख्य परीक्षा खालील दोन टप्यामध्ये घेण्यात येईल :-

  • मुख्य परीक्षा २०० गुण
  • मुलाखत ५० गुण

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा योजना इत्यादी संदर्भातील तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ७. ३ मुख्य परीक्षा :-

परीक्षेचे स्वरुप :- पारंपरिक / वर्णनात्मक

  • एकूण गुण २०० गुण
  • प्रश्नपत्रिका – दोन प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर
  • परीक्षेचे माध्यम- मराठी व इंग्रजी

Maharashtra Public Service Commission: मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम:-

  1. पेपर क्रमांक १ :-
    • सिव्हिल प्रोसिजर कोड
    • ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट
    • स्पेसिफिक रिलीफ अॅक्ट
    • लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुडस अॅक्ट अॅन्ड पार्टनरशिप अॅक्ट.
  2. पेपर क्रमांक २ :-
    • इंडियन पिनल कोड
    • एव्हिडन्स अॅक्ट
    • कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर
    • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ व नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
    • कायदेविषयक ताज्या घडामोडीबाबत निबंध (अंदाजे ८०० शब्दांचा)

Maharashtra Public Service Commission: मुख्य परीक्षेचा निकाल:-

यशस्वी उमेदवारांना उपलब्ध रिक्त पदांच्या १:३ या गुणोत्तर प्रमाणात मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. तसेच १: ३ हे गुणोत्तर प्रमाण ठेवण्यासाठी निश्चित केलेले एकसमान अंतिम गुण ज्यांनी मिळविले असतील असे एकापेक्षा अधिक उमेदवार असतील तर, अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.

मुलाखतीस बोलविण्यासाठी पात्र होण्याकरीता प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणे ही किमान अर्हता राहील.

महाराष्ट्र शासनाने सेवा प्रवेशाच्या प्रयोजनाकरीता मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या उमेदवारांच्या बाबतीत प्रत्येक प्रश्नपत्रिके मध्ये किमान ४५ टक्के गुण मिळविणे ही मुलाखतीस बोलविण्याकरीता पात्र होण्यासाठी किमान अर्हता राहील.

मुलाखत – ५० गुणः मुलाखतीत ४० % अथवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-याउमेदवारांचाच फक्त अंतिम निवडीसाठी विचार केला जाईल. ७.६ अंतिम निवड – लेखी मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.

Maharashtra Public Service Commission: प्रतीक्षा यादी :-

प्रस्तुत पदाचा अंतिम निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून १ वर्ष किंवा पुढील परीक्षेच्या अंतिम निकालाच्या दिनांकापर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तो पर्यंत प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील.

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Maharashtra Public Service Commission

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button