महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीतील राज्य प्रशासन विभागांच्या विविध शाखांमध्ये अधिका-यांची भरती करण्यासाठी MPSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी जाहिरात प्रसिद्ध करते. या जाहिराती अनुसार पूर्व परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून जवळपास पाच ते सहा लाख उमेदवार अर्ज करतात, व त्यातील जवळपास चार ते साडेचार लाख उमेदवार प्रत्यक्ष परीक्षा देतात. परीक्षा देणार्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या एकूण पदांच्या 12 पट उमेदवार पात्र ठरतात.
( उदा. 500 पदांसाठी जर जाहिरात आली असेल पाचशे च्या बारा पट उमेदवार म्हणजेच मेरिट नुसार पहिल्या 6000 उमेदवारांची cut off यादी तयार केली जाते. या यादी मध्ये विविध आरक्षित संवर्गानुसार योग्य संख्येत उमेदवार आहेत का ते तपासले जाते जर त्यांची संख्या कमी भरत असेल तर ही cut off रेषा त्या त्या संवर्गातून 12 पट उमेदवार मिळे पर्यंत खाली ओढली जाते. आशा प्रकारे अंतिम यादी तयार होईपर्यंत जवळपास सात ते साडे सात हजार उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.)
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम
(MPSC Pree Syllabus 2022)
Paper 01 – (200 Marts)
- Current events of state, national and international importance.
- History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement.
- Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra,
- India and the World.
- Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.
- Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.
- General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change – that do not require subject specialisation.
- General Science.
Paper 02 – (200 Marts)
- Comprehension
- Interpersonal skills including communication skills.
- Logical reasoning and analytical ability.
- Decision – making and problem – solving.
General mental ability. - Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) , Data
interpretation (Charts, graphs, tables, data sufficiency etc) (Class X Level) - Marathi and English Language Comprehension skills. (Class X/XII Level)
टीप – सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३% गुण मिळविणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
नकारात्मक गुणदान पेपर क्रमांक १ करीता व पेपर क्रमांक २ मधील “Decision making & Problem Solving” प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील.
- प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्न उत्त किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून बजा/कमी करण्यात येतील.
- वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णकात आली तरीही तो अपूर्णकातच राहील. व कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
- एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.
अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.