MPSC News

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 46

Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

नाम म्हणजे काय?

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाम या चाप्टर वरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर थोडक्यात नाम म्हणजे काय नामाचे प्रकार कोणते आणि कसे याबद्दल थोडक्यात माहिती पाहू…

सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय
उदाहरणार्थ पेन कागद राग सौंदर्य स्वर्ग इत्यादी

मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत

  • सामान्य नाम
  • विशेष नाम
  • भाववाचक नाम

सामान्य नाम

  • एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात.
  • सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते.
  • सामान्य नामाचे अनेक वचन होते.

उदाहरणार्थ – घर मुलगी ग्रह तारा माणूस इत्यादी….

विशेष नाम

  • एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास विशेष नाम असे म्हणतात.
  • ते फक्त एका घटका पुरतेच मर्यादित असते
  • विशेष नाम एकवचने असते विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते.

उदाहरणार्थ – गोदावरी रमेश औरंगाबाद ताजमहाल सूर्य चंद्र….

भाववाचक नाम

  • ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात.
  • हे घटक वस्तू स्वरूपात दर्शविता येत नाहीत

उदाहरणार्थ – सौंदर्य मनुष्यत्व विश्रांती श्रीमंती गर्व….

नाम या टॉपिक वर असेल, या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट (Marathi Grammar Test)

Marathi Grammar Test - 46 (नाम)

1 / 25

मोळी, ढिगारा, कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे?

2 / 25

साखर मीठ हवा तेल ही कोणती नावे आहेत?

3 / 25

समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला ........ असे म्हणतात?

4 / 25

मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात ?

5 / 25

सामान्य नाम ओळखा.

6 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

7 / 25

माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?

8 / 25

भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

9 / 25

पुढील नामाचा प्रकार ओळखा.

10 / 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. गरिबांना सर्वांची सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे.

11 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे बोलणे मनाला लागले आहे.

12 / 25

खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा?

13 / 25

वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. या वाक्यातील रामायण या शब्दाची जात ओळखा.

14 / 25

सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा?

15 / 25

खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे?

16 / 25

पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?

17 / 25

पुढील शब्दांतील भाववाचक नाम ओळखा

18 / 25

प्रामाणिकपणा हे कोणते नाव आहे?

19 / 25

आशाताईच्या स्वरांतील गोडवा विलक्षण आहे

20 / 25

सुलभा हे कोणते नाव आहे

21 / 25

या वयात तुला असे वागणे शोभत नाही

22 / 25

लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली.

23 / 25

चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत

24 / 25

त्याच्या बोलण्यात परंतु चा वापर फार होतो या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे

25 / 25

महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भित्तीचित्रे म्हणून ...... ओळखली जातात.

Your score is

The average score is 61%

0%

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 42

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 41

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 40

Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button