Marathi Grammar Test: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.
नामाचे वचन विचार म्हणजे काय?
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नामाचे वचन विचार या TOPIC वरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर थोडक्यात नामाचे वचन विचार म्हणजे काय ? विचाराचे प्रकार कोणते आणि कसे याबद्दल थोडक्यात माहिती पाहू…
नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात वचनाचे एक वचन व अनेक वचन असे दोन प्रकार पडतात अनेक वचनाला बहुवचन असेही म्हणतात.
हे मात्र लक्षातच ठेवा…
- विशेष नामाचे अनेक वचन वापरल्यास ती सामान्य नामे होतात
- आमच्या शेजारी तीन पाटील आहेत.
- आदरार्थी अनेक वचन मोठ्या किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल व्यक्ती एक असून सुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेकवचनी शब्दप्रयोग केला जातो याला आदरार्थी अनेक वचन म्हणतात.
- पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील.
- गुरुजी आत्ताच शाळेत आले.
- विपुलदर्शक एकवचन विपुलता दर्शवण्यासाठी काही नामांचे एक वचन वापरतात
- यंदा जरा जास्त पपई आली
- जत्रेत लाख माणूस जमलं
- यावर्षी बराच आंबा पिकला
- खालील नामे नेहमी अनेक वचनीच आढळतात.
- डोहाळे कांजण्या शहरे रोमांच चिपळ्या आट्यापाट्या क्लेश हाल
- सामान्यपणे खालील समूहदर्शक शब्द एकवचनी अर्थाने वापरतात
- जोडपे पंचक त्रिकूट आठवडा भीम रास मंडळ
आजची टेस्ट नामाचे वचन विचार या टॉपिक वर असेल, या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट (Marathi Grammar Test)
Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 44
Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 43
Geography Practice Question Paper : भूगोल सराव प्रश्न उत्तरे टेस्ट – 03
Whatsapp Group | येथे क्लिक करा |
Telegram Channel | येथे क्लिक करा |
Facebook Page | येथे क्लिक करा |
Instagram Page | येथे क्लिक करा |
MPSC Official | येथे क्लिक करा |