MPSC News

Nagar Parishad Bharti News : नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट, आता आक्षेपांसाठीही पैसे…

Nagar Parishad Bharti News : नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी Nagar Parishad Bharti 2023 पार पडलेली आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आजचा विषय मात्र गंभीर आहे कारण हे सरकार आणि सरकारी कामकाज ज्या प्रमाणे चालले आहे, त्यामध्ये आपल्या सारख्या मित्रांचे खूप नुकसान होत चालले आहे.

त्यातच अशी बातमी मिळाली कि आता शासकीय नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांना प्रतिप्रश्न द्यावे लागणार शंभर रुपये भरावे लागणार आहेत. त्याच बद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शासकीय नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट, प्रतिप्रश्न द्यावे लागणार शंभर रुपये

महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद मधील गट-क श्रेणी अ, ब आणि क मधील 1782 रिक्त असेलेली पदे / सरळसेवेने जागा निघाल्या होत्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट होती. त्या विविध पदांचा पेपर सुद्धा झाला. त्या परिक्षेची Answer Key (Responce Sheet) उपलब्ध झालेले आहेत.

Nagar Parishad Bharti नेमका विषय काय?

शासकीय नोकर भरतीच्या परीक्षा फॉर्म भरताना शासनाने प्रत्येक विद्यार्थी साठी एक हजार रुपये आकारल्यानंतर आता Nagar Parishad Bharti परीक्षेतील प्रश्नांवर आक्षेप असेल तर नोंदविण्यासाठीही पैसे भरावे लागणार आहेत. यापूर्वी परीक्षा शुल्कापोटी खासगी कंपन्यांनी शेकडो कोटी रुपये जमा केले आहेत तरीही विद्यार्थ्यांची पुन्हा ही लूट का? असा सवाल विचारण्यात येत आहे. महेश घरबुडे, स्पर्धा (परीक्षा समन्वय समिती) यांच्याशी संवाद साधला असता अशी माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली.

Nagar Parishad Bharti १३ डिसेंबरपर्यंत मुदत

मागच्या महिन्यात पार पडलेल्या Nagar Parishad Bharti गट- क परीक्षेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्तरतालिका (Response Sheet) 30 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या id वर उपलब्ध करून दिली आहे.

उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना किंवा आक्षेप असल्यास ऑनलाइन पद्धतीने 13 डिसेंबरपर्यंत नोंदविता येणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपये शुल्क भरणा करायचे आहेत. नगर परिषद प्रशासनाने 2 दिवसांपूर्वी या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केलेले आहे.

प्रत्येक विद्यार्थी एक हजार रुपये शुल्क आकाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष झालेले आहेत. हे शुल्क जास्त असल्याचा मुद्दा यापूर्वी आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला होता. परंतु , शुल्क कमी करण्याऐवजी सरकारने त्याचे समर्थन केले होते. वा रे सरकार..

एक हजार रुपये शुल्क घेऊनही खासगी कंपन्यांचे पोट भरले नाही का? प्रत्येक प्रश्नाच्या आक्षेपासाठी शंभर रुपये आकारले जात आहेत. चुकीची उत्तरतालिका कंपन्या बनवणार, मग चुका दुरुस्तीची किंमत परीक्षार्थीनी का चुकवावी? ही सरकारमान्य लूटमार चालू आहे. याबाबत तुमचे काय मत आहे नक्की कळवा.

महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

Nagar Parishad Response Sheet: नगर परिषद भरती 2023 रिस्पॉन्स शीट जाहीर

MPSC Geography Notes: महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे ? Best 5 Tips

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button