MPSC News

पोलीस प्रशासन वनलायनर (Police Administration Oneliner)

Police Administration Oneliner : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आपण पोलीस प्रशासन बद्दल काही महत्त्वाचे ऑनलाईनर प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या अनुषंगाने काढण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासन कार्य कसे करते कोणाच्या अंतर्गत असते किंवा थीम काय त्याच्यानंतर स्थापना अशा प्रकारची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर संपूर्ण आर्टिकल व्यवस्थित वाचून घ्या आणि पाठच करा. सोबत आपण आपल्या एमपीएससी न्यूज या वेबसाईट वरती दररोज एक टेस्ट टाकण्याचा प्रयत्न करत असतो दररोज एक टेस्ट सोडवा तुमचा भरपूर सराव होईल.

पोलीस प्रशासन वनलायनर (Police Administration Oneliner)

  • राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारित चालते.
  • विशेष पोलीस महानिरीक्षक हा अधिकारी ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख असतो.
  • ‘सशस्त्र सीमा बल’ या केंद्रीय पोलीस दलाची पहिली डायरेक्टर जनरल अर्चना रामसुंदरम्
  • तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा पुरविणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह – नागपूर मध्यवर्ती कारागृह हे असून 28 जानेवारी, 2016 पासून सुरुवात करण्यात आला आहे.
  • महाराष्ट्रात प्रथमच छ.संभाजीनगर ग्रामीण पोलिस विभागाअंतर्गत पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून पिंक स्कॉड महिला बिट अंमलदार पथक प्रथम स्थापन करण्यात आले.
  • पर्यटकांना मार्गदर्शन करणारे पर्यटन पोलिस मदत केंद्र महाराष्ट्रात सर्वप्रथम शिर्डी, जिल्हा अहमदनगर येथे पोलिसांनी सुरू केले. (Police Administration Oneliner)
  • होमगार्ड या संघटनेची 1946 साली मुंबईत प्रथम स्थापना करण्यात आली आहे.
  • CID ची स्थापना दिवस – 26 ऑक्टोबर 1905
  • CID चे बोधवाक्य अर्तत्राणाय व शस्त्रम आहे.
  • ACB ची निर्मिती 26 नोव्हेंबर 1957 रोजी झाली.
  • RAF – Railway Protection Force.
  • महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख पोलीस महासंचालक असतात.
  • डॉबरमॅन, पॅग, ग्रेट, डेन हे श्वान चे प्रकार आहेत. (Police Prashasan Oneliner)
  • नागपूर पोलीस आयुक्तालयाची स्थापना 1965 या साली झाली.
  • सलवा जुडूम हे नक्षलवाद विरोधी जनसंघटना आहे.
  • भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा RAW आहे.
  • भारतातील सर्वप्रथम महिला पोलीसाची नेमणूक मुंबई येथे करण्यात आली.
  • पोलीस दलाचे ब्रीदवाक्याचे अर्थ सज्जनांचे रक्षण करणे व दुर्जनांचे निर्दालन करणे असे आहे.
  • महाराष्ट्रात पुरुष खुले कारागृह पुणे, छ. संभाजीनगर, मोर्शी, पैठण येथे आहेत.
  • फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय मुंबई आहे.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 39

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel