Samanarthi Shabd Marathi : येथे आपण काही समानार्थी शब्द (Samanarthi Shabd = Synonyms Marathi) बघणार आहे ज्यांचे समान अर्थ आहेत.
समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असणाऱ्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात. अशा शब्दांना समानार्थी किंवा सारखे अर्थ निघणारे शब्द म्हणतात. किंवा सोप्या भाषेत : एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
म्हणजेच ज्या शब्दांचा अर्थ समान असतो त्यांना ‘समानार्थी शब्द‘ म्हणतात. आपण असे देखील म्हणू शकतो – ज्या शब्दांच्या अर्थात समानता आहे त्यांना ‘समानार्थी शब्द’ म्हणतात.
इतर अर्थाने – समान अर्थ असलेल्या शब्दांना ‘समानार्थी’ किंवा समानार्थी शब्द देखील म्हणतात.
जसे- सूर्य, दिनकर, दिवाकर, रवी, भास्कर, भानू, दिनेश- या सर्व शब्दांचा अर्थ ‘सूर्य’ असा होतो. अशा प्रकारे हे सर्व शब्द ‘सूर्य’चे समानार्थी शब्द आहे.
अनल = अग्नी, विस्तव: पावक, वन्ही
अभिनय = हावभाव, अंगविक्षेप
अभिनेता = नट
अभियान = मोहीम
अमित = असंख्य, अगणित, अपार
अमृत = सुधा, पीयूष, अपार
अरण्य = रान, कानन, वन, विपीन
अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन
अश्व = घोडा, हय, तुरग, वारू, वाजी
अही = सर्प, साप, भुजंग, व्याल
आई = माता, जननी, माय, जन्मदा