MPSC News

General Knowledge Questions in Marathi ( Part – 1)

General knowledge questions in marathi : नमस्कार मित्रांनो लहान मुलापासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत जनरल नॉलेज जाणून घ्यायला सर्वानाच आवडते. आणि याची किती गरज आपल्याला आहे हे मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi) जाणून घेणार आहोत.

General Knowledge Questions in Marathi

१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर – २४ डिसेंबर.

२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर – मॅकमिलन.

३) ‘कुरल’ या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर – पांडूरंग सदाशिव साने.

४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर – १९२० मध्ये.

५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.

६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर – वड.

७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर – थाॅमस अल्वा एडिसन.

८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर – विंबलडन.

९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर – २० मार्च १९२७.

१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर – C₁₂H₂₂O₁₁

११) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर – दादासाहेब फाळके.

१२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर – रूडाल्फ डिझेल.

General Knowledge Questions in Marathi
General Knowledge Questions in Marathi (Who invented the diesel engine? Answer – Rudolph Diesel.)

१३) ‘फटका’ या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर – अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी

१४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर – २७० ते २८० ग्रॅम.

१५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
उत्तर – ४ सप्टेंबर १९२७.

१६) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर – पुणे.

१७) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर – जेम्स वॅट.

१८) ‘एकच प्याला’ या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर – राम गणेश गडकरी.

१९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
उत्तर – ८ जुलै १९३०.

२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर – C₆H₁₂O₆

२१) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर – त्याग आणि शौर्य.

२२) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर – अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

२३) ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर – रानकवी.

२४) अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर – २९ आॅगस्ट.

२५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर – २७ मे १९३५.

स्पर्धा परीक्षा मोफत चालू घडामोडी उपक्रम WhatsApp 73 5003 7272 वर Join Now असा Massage करा.
स्पर्धा परीक्षा मोफत चालू घडामोडी उपक्रम WhatsApp 73 5003 7272 वर Join Now असा Massage करा.

२६) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर – किवी.

२७) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर – थाॅमस अल्वा एडिसन.

२८) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
उत्तर – विवेकसिंधू.

२९) ‘सनी डेज’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर – सुनील गावस्कर.

३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
उत्तर – महात्मा फुले.

३१) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
उत्तर – व्हाइट हाऊस.

३२) अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर – ब्रेल लुईस.

General Knowledge Questions in Marathi (2)
General Knowledge Questions in Marathi (Who invented script for the blind? Answer – Braille Lewis.)

३३) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*
उत्तर – अरूणा ढेरे.

३४) ‘गोल्डन गर्ल’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- पी. टी. उषा.

३५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
उत्तर – फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.

३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
उत्तर – मोचनगड, गुंजीकर यांची

३७) महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर – सयाजीराव लक्ष्मण सीलप

३८) देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
उत्तर – कोल्हापूर.

३९) श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते ?
उत्तर – प्र.के.अत्रे

४०) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर – 1990

४१) तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
उत्तर – कावेरी नदी.

४२) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर – अलेक्झांडर फ्लेमिंग.

४३) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर – कृष्णाजी केशव दामले.

४४) अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर – अॅथेलेटिक्स.

४५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
उत्तर – २५ डिसेंबर १९२७.

४६) सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
उत्तर – रोम.

४७) डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
उत्तर – आल्फ्रेड नोबेल.

४८) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर – ह. ना. आपटे.

४९) ‘प्लेईंग टू विन’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर – सायना नेहवाल.

५०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य ‘शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.’ हे होते ?
उत्तर – बहिष्कृत हितकारिणी सभा.

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
General Knowledge Questions in Marathi

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button