MPSC News

Rajya Utpadan Shulk: राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 अपडेट

Rajya Utpadan Shulk: नमस्कार मित्रानो राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३ (State Excise Department Recruitment Update 2023) उपडेट पाहणार आहोत. आताच आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे ते तुम्ही खाली वाचू शकता.

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (Rajya Utpadan Shulk), महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांचे कार्यालय दुसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००२३.

ई-मेल आयडी : www.establishmenta@gmail.com
संकेतस्थळ: https://stateexcise.maharashtra.gov.in
क्रमांक : इएसटी११२०२३/भरतीप्रक्रीया २०२३ / आस्था

जाहिरात शुध्दीपत्रक

राज्य उत्पादन शुल्क (Rajya Utpadan Shulk) विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट-क) आणि चपराशी ( गट-ड ) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात राज्य शुल्क (Rajya Utpadan Shulk) विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.३०.०५.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये पुढीलप्रमाणे दुरुस्ती आहे.

अ) यवतमाळ जिल्ह्यात जवान या पदासाठी भज (ड) प्रवर्गातील जवान या संवर्गाचे ०१ पद रिक्त असल्याचे नमुद केलेले होते. तथापि यवतमाळ जिल्ह्यात जवान या संवर्गाचे पद उपलब्ध नसल्याने फक्त यवतमाळ जिल्ह्याकरिता जवान या संवर्गाची पदभरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे.

ब) भंडारा जिल्ह्यात जवान नि वाहनचालक या पदभरतीसाठी दि. ३०.०५.२०२३ रोजीच्या जाहिरातीप्रमाणे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील एक पद रिक्त आहे, असे नमुद केले होते. परंतु त्या जिल्ह्यात त्या प्रवर्गाचे पद रिक्त नाही. तथापि त्या जिल्ह्यात अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील एक पद रिक्त आहे.

तरी उक्त नमुद पदांकरिता अर्ज केलेल्या संबंधित उमेदवारांना अन्य जिल्ह्यात अर्ज करण्याबाबत या शुध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे. जर उमेदवार अन्य जिल्ह्यात अर्ज करण्यास इच्छुक नसल्यास त्यांना अर्ज शुल्काचा परतावा (रिफंड) करण्यात येईल.

आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (Rajya Utpadan Shulk), महाराष्ट्र राज्य, मुंबई

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button