MPSC News

What is Name and How Many types of It : नाम म्हणजे काय? व त्याचे प्रकार किती? सविस्तर वाचा ते 7 नवीन नियम…

नाम व त्याचे प्रकार

नाम म्हणजे काय?
प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात.

उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.

नामाचे प्रकार :

नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

सामान्य नाम –
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.

उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.

सामान्य नामविशेषनाम
पर्वतहिमालय, सहयाद्री, सातपुडा
मुलगास्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरव
मुलगीमधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनी
शहरनगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर
नदीगंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी

टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

विशेष नाम –
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.

उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.

टीप : (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नसल्यास सामान्य नाम समजावे.)
उदा. या गावात बरेच नारद आहेत.

भाववाचक नाम –
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

टीप : (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्‍या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)
भाववाचक नामे साधण्याचे प्रकार –

सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणे –

शब्दप्रत्ययभाववाचक नामइतर उदाहरणे
नवलआईनवलाईखोदाई, चपडाई, दांडगाई, धुलाई
श्रीमंतश्रीमंतीगरीबी, गोडी, लबाडी, वकिली
पाटीलकीपाटीलकीआपुलकी, भिक्षुकी
गुलामगिरीगुलामगिरीफसवेगिरी, लुच्चेगिरी
शांतताशांतताक्रूरता, नम्रता, समता
मनुष्यत्वमनुष्यत्वप्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व
शहाणापण, पणाशहाणपण, पणादेवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण
सुंदरसौदर्यगांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्य
गोडवागोडवाओलावा, गारवा

What is Name and How Many types of It : नाम म्हणजे काय? व त्याचे प्रकार किती? सविस्तर वाचा ते 7 नवीन नियम…

नामाचे कार्य करणारे इतर शब्द :

टीप : नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी, सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत.
अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-

नियम –

  1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.

उदा.

आत्ताच मी नगरहून आलो.
शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.
वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

  1. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.

उदा.

  • तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
  • आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.
  • आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.
  • वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
  • पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.
  1. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.

उदा.

  • शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे.
  • विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
  • माधुरी उधा मुंबईला जाईल.
  • वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.

  1. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.

उदा.

  • आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.
  • या गावात बरेच नारद आहेत.
  • माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.
  • विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

  1. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.

उदा.

  • शहाण्याला शब्दांचा मार.
  • श्रीमंतांना गर्व असतो.
  • जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.
  • जगात गरीबांना मान मिळत नाही.
  • वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 29

World Economy Ranking 2023: येथे पहा संपूर्ण यादी!

  1. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.

उदा.

  • आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.
  • त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
  • नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.
  • वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.

  1. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.

उदा.

  • ज्याला कर नाही त्याला डर कसली.
  • गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.
  • ते ध्यान पाहून मला हसू आले.
  • देणार्‍याने देत जावे.
  • वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.
Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
What is Name and How Many types of It : नाम म्हणजे काय? व त्याचे प्रकार किती? सविस्तर वाचा ते 7 नवीन नियम…

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button