राज्यात लवकरच साडेसात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री, गृहविभागाच्या मुख्य सचिवांची बैठक घेण्यात आली.
या भरतीनंतर आणखी एक मोठी भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री औरंगाबादेत केली. टी. व्ही. सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिली. तसेच शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 31, 2022
विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. तसेच शहरातील T V Center परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
Police Bharti साठी Police Bharti 2022 Free Test Series नक्कीच फायद्याच्या ठरतील. या सर्व प्रकारच्या प्रश्नाचा विचार करून बनवलेल्या आहेत.
Police Bharti Free Test Series