MPSC News

हायटेक कॉपीमुळे महाराष्ट्र पोलिस अलर्ट; १८,३३१ पदांसाठी परीक्षा…

Police Bharti Update: राज्यात पोलिस शिपाई, चालक, राज्य राखीव पोलिस दलातील शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १८ लाख १२ हजार ५३८ युवकांनी अर्ज केला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मैदानी चाचणी घेतली जात आहे. यात पात्र उमेदवारांची लवकरच एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मागील वेळच्या हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे महाराष्ट्र पोलिस विभागही अलर्ट झाला आहे.

पोलिस शिपाईपदाच्या १४ हजार ९५६ जागांसाठी १२ लाख २५ हजार ८९९ अर्ज, चालक पोलिस पदाच्या दोन हजार १७४ जागांसाठी दोन लाख १५ हजार १३२ अर्ज आणि राज्य राखीव पोलिस दलातील एक हजार २०१ जागांसाठी तीन लाख ७१ हजार ५०७ अर्ज असे एकूण १८ लाख १२ हजार ५३८ उमेदवार पोलिस भरतीसाठी मैदानात उतरले आहेत.

२ जानेवारीपासून राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. यात पात्र ठरलेल्यांची लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार असून, राज्यभरात एकाचवेळी ही परीक्षा होणार आहे.

mpsc news GIF
marathi grammer free test mpscnews

मराठी व्याकरण फ्री टेस्ट

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

मागील पोलिस भरतीच्या वेळी औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील युवकांनी हायटेक कॉपी करण्याचा प्रयत्न पुणे, नागपूर आदी ठिकाणच्या लेखी परीक्षेच्या वेळी केला होता. आता होत असलेल्या भरतीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. यावेळी असा काही प्रकार घडू नये, यासाठी योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

राजस्थानातील घटनेचे व्हिडीओ झाले व्हायरलराजस्थानातील घटनेचे व्हिडीओ झाले व्हायरल

  • राजस्थानमध्ये मागील वर्षी अध्यापक पात्रता परीक्षेत काही तरुणांनी कॉपीसाठी हायटेक तंत्रज्ञान वापरले.
  • चप्पलमध्ये सिमकार्ड, कानात लहान यंत्र बसविले होते. ते ब्ल्यू टूथच्या माध्यमातून कनेक्ट करून बाहेरून प्रश्नांची उत्तरे सांगण्यात येत होती. त्या घटनेचे व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत.
  • तसाच प्रकार मागील वेळी पोलिस भरतीमध्ये झाला होता. पुणे नागपूरसह इतर ठिकाणी झालेल्या भरतीमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
  • यात औरंगाबाद शहरातील पोलिस शिपायांसह जालन्यातील युवकांचा समावेश असल्याचे उघड झाले होते.

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button