MPSC News

MPSC News Today: अधिवेशनामध्ये निरंजन डावखरे यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले?

MPSC News Today: नमस्कार मित्रांनो सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये मिळालेल्या माहिती नुसार स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये मा.श्री.निरंजन डावखरे साहेब यांनी खालील प्रश्न सभागृहात उपस्थित केले. (MPSC News Today: What questions did Niranjan Dawkhare raise in the session?)

MPSC News Today

भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळातील गट ब (अराजपत्रित) व गट क ही सर्व पदे एमपीएससी कडे देण्यात यावीत, यासाठी 02 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला शासन निर्णयानुसार त्या त्या विभागांनी सेवा प्रवेश नियम यात सुधारणा करण्यात येऊन MPSC कडे सर्व पदे देण्यात यावीत.

MPSC ला सक्षम करण्यासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला.

पेपर फुटीच्या संदर्भात उत्तराखंड व झारखंडच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने देखील पेपर फुटी ला आळा बसण्यासाठी कायदा आणावा या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.

परीक्षांची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करणे तसेच पेपर फुटीला आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असून, ३ महिन्यात अहवाल सादर करणे आहे. काही सूचना असल्यास सांगाव्यात.

MPSC News Today निर्णय काय? महत्वाचे आहे

राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार, पेपरफुटी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड व झारखंड राज्याच्या धर्तीवर कठोर कायदा करण्याची मागणी विधान परिषदेत केली होती.

त्यानंतर राज्य सरकारने आज तातडीने पावले उचलून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘एमपीएससी’ परीक्षेची कार्यपद्धती पुर्णपणे संरक्षित करण्यासाठी आणि पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘एमपीएससी’चे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर जी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती स्थापन केली आहे.

या समितीत मुंबई महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त सुरेश जी काकाणी, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शहाजी सोळुंके व ‘एमपीएससी’च्या सचिवांचा समावेश राहील. या समितीकडून पेपर फुटी व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी तीन महिन्यात अहवाल दिला जाणार आहे.

या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपुर्वक आभार.

MPSC Interview Question: राज्यसेवा मुलाखत 2022 Transcript Avinash Lodhe

IB Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती! 955 जागा संधी सोडू नका, लगेच अर्ज करा

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button