दृष्टी गेली तरीही आईनं मुलाला असं बनवलं UPSC टॉपर, देशातून ७ वी रँक पटकावली!

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर झाला आहे. यंदा या परीक्षेत 685 उमेदवार पात्र ठरले आहेत. या उमेदवारांपैकी दिल्लीतील रोहिणी भागात राहणाऱ्या सम्यक एस जैन या विद्यार्थ्याने या परीक्षेत 7 वा क्रमांक मिळवला आहे. मात्र, सम्यकची निवड वेगळी का आहे, त्याचं यश थोडंसं हटके का आहे तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे तो दृष्टिहीन आहे, असं असूनही त्याने यूपीएससीसारखी खडतर परीक्षा दुसऱ्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे.

दिल्लीच्या सम्यक जैनने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेच्या निकालात म्हणजेच UPSC मध्ये टॉप १० मध्ये सातवा क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. सम्यकला दृष्टीहिन आहे, पण टॉप १० मध्ये येऊन त्याने लाखो विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवून दिला आहे.

अनुवांशिक रोगामुळे सम्यकची दृष्टी कमी झाली

वयाच्या १८ व्या वर्षी सम्यकची दृष्टी गेली तेव्हा त्याच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. सम्यकने सांगितलं की, ‘मी 18 वर्षांचा होतो तेव्हा असं आढळून आलं की मला एक अनुवांशिक आजार आहे ज्यावर कोणताही इलाज नाही. यामध्ये समस्या वाढतच जाते. आता मी दृष्टिहीन आहे. मला वाचता येत नाही आणि लिहिता येत नाही म्हणून मला तोंडी सांगावं लागतं आणि माझी आई ते लिहून काढायची”

UPSC शिवाय दुसरा कोणता चांगला मार्ग नाही

  • सम्यकचा जन्म दिल्लीत झाला. वयाच्या १३व्या वर्षापर्यंत दिल्लीत वास्तव्य केलं.
  • त्याचं शालेय शिक्षण शाहदरा, दिल्ली येथं झालं.
  • एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या वडिलांची मुंबईत बदली झाली आणि तेथून सम्यकनं दहावी-बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं.
  • इंजिनीअरिंगचा अभ्यास सुरू केला पण काही कारणांमुळे त्याला सोडावं लागलं आणि नंतर सम्यक दिल्लीला आला. त्यानं दिल्ली विद्यापीठात BA इंग्लिश ऑनर्स केलं.
  • पुन्हा आयआयएमसी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून इंग्रजी पत्रकारितेचा कोर्स केला आणि तेथून पुन्हा जेएनयूमध्ये प्रवेश घेतला. तिथं सम्यकनं आंतरराष्ट्रीय संबंधांचं शिक्षण घेतलं.
  • जेएनयूमध्ये शिकत असताना सम्यकला यूपीएससीसाठीची प्रेरणा मिळाली आणि त्याने तयारी सुरू केली.
  • पत्रकारितेदरम्यान देश जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची खूप चांगली संधी मिळाल्याचं सम्यक म्हणतो.
  • देशासाठी आणि देशाची परिस्थिती बदलण्यासाठी UPSC पेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही असं सम्यकला वाटतं.

आई-वडिलांनी केली सर्वाधिक मदत

सम्यकला डिजिटल स्वरूपातील पुस्तकांची गरज असल्यानं सर्व ती उपलब्ध होतील याची काळजी आईनं घेतली होती. तर त्याच्या मित्रांनीही मदत केली. मार्गदर्शन केलं, नोट्स दिल्या आणि सर्वतोपरी मदत केली. चर्चा आणि वादविवादातही मदत केली. सम्यक दिवसातून सुमारे ७ तास अभ्यास करायचा, त्यात तो ब्रेकही घेत असे. सम्यक म्हणतो की त्याला या निकालाची कधीच अपेक्षा नव्हती.

Leave a Comment