MPSC News

20+ Multi-Purpose Irrigation Projects in India : भारतातील बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प

Multi-Purpose Irrigation Projects: बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प यामध्ये दामोदर खोरे योजना, भाक्रा-नानगल प्रकल्प, हिराकुड प्रकल्प, उकाई प्रकल्प, तुंगभद्रा प्रकल्प, नागार्जुनसागर प्रकल्प, चंबळ प्रकल्प (चंबळ नदीवर) रिहांद प्रकल्प, जायकवाडी प्रकल्प, कोसी प्रकल्प, पेरियार प्रकल्प, सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प, इंदिरा सागर धरण, रामगंगा प्रकल्प, तिहरी प्रकल्प, राजस्थान कालवा योजना, कोलडाम धरण, सायलेंट व्हॅली प्रकल्प, कुकडी प्रकल्प, किसनगंगा प्रकल्प, सौनी योजनेचे लोकार्पण, सलाल जलविद्युत प्रकल्प या सर्वांची माहिती पाहणार आहोत. (Multi-Purpose Irrigation Projects)

Multi-Purpose Irrigation Projects in India

१) दामोदर खोरे योजना :

 • अमेरिकेतील ‘टेनेसी व्हॅली कार्पोरेशन’ (TVC)च्या धर्तीवर १९४८ साली भारतात ‘दामोदर खोरे विकास प्रकल्पाची’ स्थापना झाली.
 • दामोदर ही हुगळी नदीची उपनदी आहे.
 • विभाजनपूर्व बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांचा संयुक्त प्रकल्प.
 • तत्कालीन बिहार व पश्चिम बंगाल राज्यातील दामोदर नदीच्या महापुराची समस्या या महायोजनेमुळे मिटली असून ‘दामोदर म्हणजे बिहारचे दुःखाश्रू’ ही संकल्पना मागे पडण्यास मदत झाली आहे.
 • पहिल्या पंचवार्षिक योजनेंतर्गत हाती घेतलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून बिहार राज्यात व पश्चिम बंगालमध्ये खालील ठिकाणी धरणे बांधण्यात आली.
 • झारखंड राज्यात : तिलैय्या, मैथुन, पंचेत, काणोर येथे धरणे.
 • प. बंगाल राज्यात : दूर्गापूर येथे धरण.
 • झारखंड व प. बंगाल या राज्यांसाठी दामोदर खोरे प्रकल्प वरदान ठरला आहे.

२) भाक्रा-नानगल प्रकल्प :

‘भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना.’
स्थापना : १९४६ (सतलज नदीवर), बहुउद्देश : जलसिंचन, जलविद्युत निर्मिती.
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाणा या चार राज्यांचा संयुक्त प्रकल्प.
या प्रकल्पातील वीज पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान व चंदिगढ यांना पुरविली जाते. सतलज नदीवर दोन टप्प्यांत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. (Multi-Purpose Irrigation Projects in India)

पहिल्या टप्प्यात : हिमाचल प्रदेशात ‘भाक्रा’ (जि. विलासपूर) येथे २२६ मीटर उंचीचे धरण.

दुसऱ्या टप्प्यात : पंजाब राज्यात रोपोरजवळील ‘नानगल’ येथे २९ मी. उंचीचे धरण.

 • पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘New Temple of Resurgent India’ या शब्दांत भाक्रा धरणाचे महत्त्व स्पष्ट केले.

भाक्रा धरणाची वैशिष्ट्ये :

 • धरणाच्या जलाशयाचे नाव : ‘गोविंद सागर’ (देशातील तिसरा मोठा जलाशय)
 • २२६ मीटर उंचीचे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे धरण.
 • येथून नानगल धरणात पाणी सोडले जाते.
 • जगातील सर्वांत उंच धरणांपैकी एक प्रमुख धरण.
 • या प्रकल्पामुळे पंजाब, हरियाणा राज्यातील उद्योगांचा विकास झाला आहे.
 • १९७० च्या दशकात हरितक्रांतीची सुरुवात याच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात झाली व तेथे मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली. (Multi-Purpose Irrigation Projects in India)

३) हिराकुड प्रकल्प :

 • ओडिशा राज्याचा बहुदेशीय प्रकल्प (जलविद्युत निर्मिती, पूरनियंत्रण).
 • बांधकाम सुरूवात : १९४८
 • राष्ट्रार्पण : १३ जानेवारी १९५७ (पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते)
 • ओडिशातील संबळपूरजवळ हिराकूड येथे ‘महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण’ (२५.८० कि.मी.) बांधण्यात आले आहे.
 • याशिवाय ‘टिकरपाडा’ व ‘नराज’ येथेदेखील महानदीवर धरणे बांधण्यात आली आहेत.
 • फलित : हिराकूड प्रकल्पातील जलविद्युत रूरकेला (ओडिशा) येथील लोह-पोलाद प्रकल्पास पुरविली जाते.
 • महानदी व तिच्या मांद, तेल या उपनद्यांमुळे येणाऱ्या महापुरांचे नियंत्रण, पाणीपुरवठा हे उद्देश सफल झाले आहेत. (Multi-Purpose Irrigation Projects in India)

४) उकाई प्रकल्प :

 • गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प.
 • उद्देश : पूरनियंत्रण, जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती.
 • या योजनेंतर्गत गुजरातमध्ये तापी नदीवर सुरत जिल्ह्यात ‘उकाई’ व ‘क्राक्रापारा’ ही दोन धरणे बांधली आहेत.

५) तुंगभद्रा प्रकल्प :

 • विभाजनपूर्व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांचा संयुक्त प्रकल्प.
 • उद्देश : सिंचन व जलविद्युतनिर्मिती.

६) नागार्जुनसागर प्रकल्प :

 • विभाजनपूर्व आंध्र प्रदेश राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प.
 • आंध्र प्रदेशातील गुंटूर व तेलंगणातील नलगोंडा दरम्यान कृष्णा नदीवर धरण.
 • या धरणापासून ‘जवाहर कालवा’ व ‘लालबहाद्दूर कालवा’ असे दोन कालवे सिंचनाच्या उद्देशाने काढले आहेत.

७) चंबळ प्रकल्प (चंबळ नदीवर) :

 • राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प.
 • मुख्य उद्देश : विद्युतनिर्मिती
 • प्रकल्पातील दोन्ही राज्यातील मिळून धरणांची संख्या : ३
 • मध्य प्रदेशात : चौरासीगढ येथे धरण (जलाशयाचे नाव : गांधीसागर)
 • राजस्थान : चुलिया येथे धरण (जलाशय : राणाप्रतापसागर) व कोटा येथे धरण (जलाशयाचे नाव : जवाहरसागर)

८) रिहांद प्रकल्प :

 • उत्तर प्रदेशचा प्रकल्प : उत्तर प्रदेशात मिर्झापूर येथे धरण.
 • उद्देश : विद्युतनिर्मिती व जलसिंचन

९) जायकवाडी प्रकल्प :

 • महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे गोदावरी नदीवरील प्रकल्प.
 • पायाभरणी : १८ ऑक्टोबर १९६५ (लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते).
 • राष्ट्रार्पण : २४ फेब्रु. १९७६ (श्रीमती इंदिरा गांधी).
 • जलाशयाचे नाव : नाथसागर •
 • हे धरण प्रथम बीड जिल्ह्यातील जायकवाडी (जयकुची वाडी) येथे प्रस्तावित होते; मात्र नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे हे धरण बांधले तरी मूळ जायकवाडी नाव कायम राहिले.
 • दुहेरी उद्देश : वीज निर्मिती व वीजनिर्मितीनंतर बाहेर आलेले पाणी पुन्हा उपसा करून धरणात सोडणे, अशी दुहेरी योजना असलेला जायकवाडी हा भारतातील एकमेव प्रकल्प.
 • धरण परिसरात म्हैसूर (कर्नाटक) येथील ‘वृंदावन गार्डन’च्या धर्तीवर पैठण येथे ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ विकसित केले आहे.
 • जायकवाडी वीजप्रकैल्प क्षमता : १२ MW. येथून परळी औष्णिक वीज केंद्रात पाणीपुरवठा केला जातो.
 • जायकवाडी प्रकल्पावरील भार कमी करण्यासाठी सिंधफणा नदीवर माजलगाव येथे धरण बांधले आहे. (Multi-Purpose Irrigation Projects in India)

१०) कोसी प्रकल्प :

 • भारतातील (विभाजनपूर्व) बिहार राज्य व नेपाळ यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प.
 • या प्रकल्पांतर्गत नेपाळमधील छतिया व हनुमाननगर येथे कोसी नदीवर दोन धरणे बांधली आहेत.

११) पेरियार प्रकल्प :

या प्रकल्पांतर्गत, केरळमधील पेरियार या पश्चिम वाहिनी नदीवर धरण बांधून त्यातील पाणी पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई नदीत सोडण्यात आले आहे.
तामिळनाडूमधील मदुराई व केरळमधील एर्नाकुलम या जिल्ह्यांना फायदा.

१२) सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प :

 • स्थळ : नवगाव (गुजरात).
 • देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला हा प्रकल्प त्याविरुद्धच्या आंदोलनामुळे (‘नर्मदा बचाव’ आंदोलन, नेत्या मेधा पाटकर) रखडलेला आहे.
 • या प्रकल्पांतर्गत नर्मदा व तिच्या उपनद्यांवर एकूण २ मोठी व २९ लहानमोठी धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे.
 • ‘सरदार सरोवर’ आणि ‘नर्मदासागर’ (इंदिरासागर) ही दोन मोठी धरणे यामध्ये अपेक्षित आहेत.

सहभागी राज्ये : मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र. (यामध्ये महाराष्ट्राचा वाटा २७ टक्के आहे.)

 • अरुंधती रॉय यांनी नर्मदा बचाव आंदोलनास पाठिंबा देताना ‘द कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ (१९८९) या ग्रंथात ‘द ग्रेटर कॉमन गूड’ हा लेख लिहिला.
 • प्रस्तावित उंचीवरून वाद : सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी धरणाच्या उंचीबाबत निर्देश दिले आहेत.
 • जून २०१४ मध्ये १३८.६८ मी. इतकी उंची निर्धारित करण्यात आली आहे.

१३) इंदिरा सागर धरण :

 • नर्मदा नदीवर मध्य प्रदेशचा बहुउद्देशिय प्रकल्प.
 • इंदिरासागर हा देशातील सर्वात मोठा जलाशय.
 • स्थळ : मुंडी, मध्य प्रदेश
 • उंची : ९२ मीटर
 • वीजनिर्मिती क्षमता : १००० MW

१४) रामगंगा प्रकल्प :

 • उत्तराखंडमधील (विभाजनपूर्व उत्तर प्रदेशातील) गढवाल येथे रामगंगा या गंगेच्या उपनदीवर धरण.
 • दिल्ली शहरास पेयजलाचा पुरवठा या धरणातून होतो.

१५) तिहरी प्रकल्प :

 • उत्तराखंड राज्यात भागीरथी नदीवरील धरण (उंची : २६०.५ मीटर)
 • भारतातील प्रथम क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे धरण.
 • रशियन तंत्रज्ञांचे सहकार्य.
 • २००६ मध्ये राष्ट्रार्पण.

१६) राजस्थान कालवा योजना :

 • राजस्थान व पंजाबची संयुक्त योजना.
 • याअंतर्ग – पंजाबमध्ये सतलज व बियास संगमाजवळ ‘हरिके’ येथे धरण.
 • या धरणातील ‘इंदिरा गांधी कालवा’ या कालव्यामुळे वायव्य राजस्थानच्या वाळवंटी भागाचे हरित शेतीत रूपांतर. (Multi-Purpose Irrigation Projects in India)

१७) कोलडाम धरण :

 • सतलज नदीवर हिमाचल प्रदेशातील विलासपूर व मंडी जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प.
 • लोकार्पण : जानेवारी २०१५
 • वीजनिर्मिती क्षमता : ८०० MW

१८) सायलेंट व्हॅली प्रकल्प :

 • केरळमधील कुंतीपुझा नदीवर.
 • १९७३ मध्ये नियोजन आयोगाची मान्यता.
 • पर्यावरणदृष्ट्या विवादास्पद ठरल्याने काम बंद.

१९) कुकडी प्रकल्प :

 • महाराष्ट्र सरकारचा बहुद्देशीय प्रकल्प.
 • याअंतर्गत पुणे जिल्ह्यात कुकडी व तिच्या उपनद्यांवर ५ धरणे बांधण्यात आली आहेत.

१) कुकडी नदीवर जुन्नर तालुक्यात माणिक डोह धरण (शहाजीसागर जलाशय),
२) कुकडी नदीवर जुन्नर तालुक्यात येडगाव धरण,
३) आंबेगाव तालुक्यात घोड नदीवर डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय),
४) जुन्नर तालुक्यात मीना नदीवर वडज धरण,
५) आर नदीवर पिंपळगाव जोगा धरण.

 • फायदा : पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांतील ७ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सिंचन सुविधा.

२०) किसनगंगा प्रकल्प :

 • काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात किशनगंगा नदीवर भारत ३३० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. पाकिस्तानने हा प्रश्न हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित केला होता.

२१) सौनी योजनेचे लोकार्पण :

 • १७ एप्रिल २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील बोतड येथे ‘सौराष्ट्र- नर्मदा अवतरण इरिगेशन योजना’ (सौनी योजना – SAUNI) या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व दुसऱ्या टप्प्याचे भूमीपजून केले.
 • SAUNI : Sourashtra-Narmada Avtaran Irrigation

२२) सलाल जलविद्युत प्रकल्प :

 • जम्मू-काश्मीर राज्यात चिनाब नदीवर आहे.

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Multi-Purpose Irrigation Projects in India पहिले आहेत.

भूगोल सराव प्रश्नसंच 01

भूगोल सराव प्रश्नसंच 02

Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button