MPSC News

Mumbai Police Bharti 2023 | मुंबई पोलीस दलात नवीन 3000 कंत्राटी पदांची भरती! GR निघाला, खाली पहा

Mumbai Police Bharti 2023: राज्य सुरक्षा महामंडळामार्फत मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला होता. त्याची प्रक्रिया सुरू करताना राज्य सुरक्षा महामंडळाने तीन हजार सुरक्षा रक्षक २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून पुरविणार असल्याचे जाहीर करताना सुरक्षा रक्षकांची नोंदणी व नेमणूक प्रक्रिया २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. सविस्तर वाचा नक्की फायदा होईल. आपण दररोज मोफत टेस्ट सुद्धा घेत आहोत.

राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद चालू असतानाच आता पोलिस दलातही कंत्राटी भरतीची प्रक्रिया चालू केल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. पोलिस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची ४० हजार ६२३ पदे मंजूर केली आहेत. त्यापैकी दहा हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. सणासुदीत बंदोबस्तासाठी अतिरिक्त गरज भासते, असे गृह विभागाने स्पष्ट केले होते.

तीन हजार सुरक्षारक्षकांची नियुक्ती होणार तरीही; स्पर्धा परीक्षार्थीचा आक्षेप का? Mumbai Police Bharti 2023

राज्य सरकारने पोलिस भरतीही कंत्राटी करण्याचा निर्णय घेतला आहे, कंत्राटी शिपाई कर्तव्यात किती दक्ष असतील हा सवाल आहेच; पण बेरोजगारांना काही महिने राबवून पुन्हा बेरोजगारीत ढकलून दिले जाईल. कंत्राटी भरती करण्याचा चंग बांधलेले शिंदे-फडणवीस – अजित पवार यांचे सरकार विरोधी पक्षांना आणि त्यांच्या विरोधाला तसूभरही जुमानत नसल्याचे चित्र आहे.

महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

Mumbai Police Bharti 2023

विद्यार्थ्यांचे आक्षेप

  • खासगी कर्मचारी हा शासकीय यंत्रणेला जबाबदार नसतो. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
  • हे लोक शासकीय यंत्रणेत गेल्यावर कायमस्वरूपी करण्यासाठी सरकारवर दबाव टाकतात.
  • कंत्राटी कामगार संघटना निवडणुकीच्या तोंडावर दबाव आणतात.
  • शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
  • नवीन नोकर भरतीला खीळ बसेल

नेमके GR मध्ये काय आहे?

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची ४०६२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे १०००० पदे रिक्त असून, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्यांकरिता अपुरे पडत आहे. शासन निर्णय दि. २१ जानेवारी २०२१ अन्वये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७०७६ पोलीस शिपाई संवर्गातील व पोलीस चालक संवर्गातील ९९४ पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे. (Mumbai Police Bharti 2023)

प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू असलेली ७०७६ पदे वगळल्यानंतरही आयुक्तालयात सुमारे ३००० पदे रिक्त राहत आहेत. तसेच सदर अंमलदार हे भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी २ वर्षांनंतर आयुक्तालयास उपलब्ध होणार आहेत.

पुर्ण GRयेथे क्लिक करा
सर्व नवीन सरकारी जाहिरातीयेथे क्लिक करा
जॉइन whatsapp groupयेथे क्लिक करा
Mumbai Police Bharti 2023

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान ११ महिने कालावधीसाठी एकूण ३००० मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्याची विनंती पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी संदर्भाधीन पत्रांन्वये शासनाकडे केली आहे. या विनंतीस अनुसरुन बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याची कार्यवाही पुर्ण होईपर्यत किमान ११ महिन्यांकरिता एकूण ३००० मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

कृषी सेवक भरती 2023खालील लिंक वर क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 01येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 02येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 04येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 05येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07येथे क्लिक करा

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button